नेपाळमध्ये भारतीय चलनावर संकट, ग्राहकांकडून 100 रुपयांपेक्षा मोठी नोट घेण्यास दिला जातोय नकार
पश्चिम चंपारण, 8 जुलै : सध्या नेपाळमध्ये भारतीय चलनावर मोठं संकट घोंगावत आहे. नेपाळच्या काही भागात 100 रुपयांच्या भारतीय नोटांची किंमत ठरलेल्या मानकांपेक्षा कमी ठेवली जात असून, तर कुठे 100 रुपयांहून अधिकच्या मोठ्या नोटांवर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमधील अनेक व्यापारी ह्या भारतीय नोटा घेण्यास नकार देत आहेत. नेपाळच्या चलनाच्या तुलनेत भारतीय चलनाचा विचार केला तर भारताच्या 100 रुपयांची किंमत नेपाळमध्ये 160 रुपये इतकी आहे. परंतु नेपाळमधील स्थानिक व्यापारी त्याच्या किंमतीत 10 ते 15 रुपयांची अघोषित कपात करीत आहेत, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये भारतीय चलन सुरळीत चालत होत. मात्र भारतात नोटबंदीनंतर कोट्यवधी रुपयांचे भारतीय चलन नेपाळमधल्या बँकेत पडून आहे. तसेच भारत सरकार या जुन्या नोटा बदलून देत नसल्याने नेपाळमध्ये भारताविषयी काहीशी नाराजी आहे.
नेपाळच्या फॉरेन मनी एक्स्चेंज विभागाचे कार्यकारी संचालक भीष्मराज ढुंगाना यांनी सप्टेंबर 2018 मध्ये सांगितले होते की भारत आपल्या जुन्या नोटा का बदलून देत नाही. तसेच त्याठिकाणी अनेक व्यापारी आहेत ज्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे अनेक 1000 आणि 500 च्या भारतीय नोटा पडून आहेत ज्या भारत सरकार परत घेत नाही. मीडिया रिपोर्ट्स नुसार एकदा नेपाळच्या सेंट्रल बँकने सांगितले होते की त्यांच्याकडे सुमारे आठ कोटी रुपयांच्या जुन्या भारतीय नोटा आहेत. सध्या बोलायचं झालं तर NRB च्या कर्मचार्यांच्या मते, 1000 आणि 500 रुपयांचे सुमारे 3 ते 5 कोटी भारतीय रुपये तिथल्या बँकांमध्ये पडून आहेत. SDM Jyoti Maurya : ज्योती मौर्याचा प्रियकर मनीष दुबेच्या लग्नाचे फोटो आले समोर, खूप सुंदर आहे पत्नी डिसेंबर 2018 नेपाळच्या एका वृत्तपत्राने प्रकाशित केले होते की नेपाळमध्ये 100 च्या वरच्या भारतीय नोटांवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्या दिवसांत नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एक मोठा निर्णय घेत सरकारने नेपाळच्या लोकांना 100 रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 200, 500 आणि 2,000 रुपयांच्या भारतीय नोटा ठेवू नयेत असे सांगितले होते.