JOIN US
मराठी बातम्या / देश / ‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने लाँच केलं औषध, किंमतही आहे कमी

‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने लाँच केलं औषध, किंमतही आहे कमी

बंगळुरू इथं असलेल्या आपल्या प्लांटमध्ये DESREMTM औषधाची निर्मिती होणार आहे. भारतातूनच आणखी काही देशांना या औषधाचा पुरवढा केला जाणार असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

जाहिरात

त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मितीही करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 जुलै: कोरोनावर 19 (COVID-19)  रामबाण औषध निघालेलं नसलं तरी काही कंपन्यांनी या व्हायरसवर प्रभावी ठरणारी औषधं बाजारात आणली आहेत. Cipla आणि Hetero या कंपन्यानंतर आता ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylanने सोमवारी भारतात एक औषध लाँच केलं. कोरोनाची गंभीर लक्षणे असलणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. DESREMTM असं या औषधाचं नाव असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या औषधाला मान्यता दिली आहे. Mylanचं हे औषध जेनरिक मेडिसिन म्हणून बाजारात आणलं आहे. औषधाला मागणी मोठी असल्याने कंपनी त्याचा पुरवढा कमी पडू देणार नाही असं कंपनीने म्हटलं आहे. बंगळुरू इथं असलेल्या आपल्या प्लांटमध्ये DESREMTM औषधाची निर्मिती होणार आहे. भारतातूनच आणखी काही देशांना या औषधाचा पुरवढा केला जाणार असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. औषधाच्या निर्यातीसाठी कंपनीने Gilead Sciences Inकडून t लायसन्सही प्राप्त केलं आहे. सिप्लाने आपल्या ‘Cipremi’ या औषधाची किंमत एका बॉटलसाछी 4,000 रुपये एवढी ठेवली आहे. तर Heteroने कोविफर’च्या (Covifor) औषधाची किंमत 5,400 रुपये आहे. तर Mylan ने या नव्या औषधाची किंमत 4,800 एवढी ठेवली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाख पार, 24 तासांत 40 हजार रुग्णांची नोंद देशात कोरोनारुग्णांची संख्या दररोज प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तर गंभीर रुग्णांसाठी बाजारात जी औषधं उपलब्ध आहेत त्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या औषधामुळे आणखी एक पर्याय उपलब्ध होणार असून बाजारात औषधाचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. रुग्णालयात बिग बी वडिलांच्या आठवणीत झाले भावूक; शेअर केली ही कविता देशात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना ICMRकडून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. त्या मार्गदर्शनाच्या मदतीनेच डॉक्टर उपचारांची दिशा ठरवत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या