मुंबई, 20 जुलै : कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर महानायक बिग बी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान ते सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. आता त्यांनी आपले वडील हरिवंश राय बच्चन यांची एक कविता शेअर केली आहे. याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की – त्यांच्या बाबूजींनी जी माणसं न थकता काम करीत असतात आणि जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्यावर कविता लिहिली आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले आहेत. ते आपल्या आरोग्याबाबत माहिती देण्यासह फॅन्सनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद व्यक्त करीत आहेत. वडील हरिवंश राय बच्चन यांनी एक कविता शेअर करण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सर्वजण हात उभा करुन चाहत्यांना अभिवादन करीत असल्याचे दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत. अमिताभ यांनी चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला आणि अभिषेकचा फोटोही लावला आहे. संपादन -मीनल गांगुर्डे