JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदींनी पुन्हा जिंकलं, डोनाल्ड्र ट्रम्प यांच्या आभारानंतर पंतप्रधानांनी दिलं असं उत्तर

मोदींनी पुन्हा जिंकलं, डोनाल्ड्र ट्रम्प यांच्या आभारानंतर पंतप्रधानांनी दिलं असं उत्तर

हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधांवरुन दोन्ही देशांमधील संबंध बिघडतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

जाहिरात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (USA President, Donald Trump) यांचा भारत दौरा सुरू व्हायला अवघे 2 दिवस बाकी आहेत. ट्रम्प यांच्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच हिरे, रत्न आणि मोत्यांमध्ये (Diamond & Gems) देश आणि जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानलाही (Rajasthan) ट्रम्प भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये राजस्थानची (Key role) महत्वाची भूमिका बजावणार आहे. राजस्थानच्या अरूण ग्रुपने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या भारत दौऱ्या दरम्यान त्यांच्या जेवणासाठी खास विशेष लक्झरी सोन्या-चांदीच्या कटलरी आणि टेबलवेयर तयार केले आहेत. बघा हे PHOTOS

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत आहे. या कठीण काळात भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श  उदाहरण म्हणून समोर आला आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची अमेरिकेत (America) निर्यात करण्याला मान्यता दिली आहे. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘थँक्स इंडिया’ असं ट्विटर म्हटलं होतं. अमेरिकेने आभार व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटरवर लिहिलं की, ‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अशा वेळी मित्र आणखी जवळ येतात. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि मानवतेला मदत करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. कोविड -19 विरोधातील लढा आपण मिळून जिंकू.

संबंधित बातम्या

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “कठीण परिस्थितीत मित्रांकडून अधिक सहकार्याची आवश्यकता आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयी निर्णय घेतल्याबद्दल भारत आणि तेथील जनतेचे आभार. हे मी कधीही विसरू शकत नाही. या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार. या विधानापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले होते की, जर भारत हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा  पुरवठा करीत नसेल तर याचे परिणाम वेगळे ठरू शकतात. या निवेदनानंतर 24 तासांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला स्वर बदलला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली, ते खूपच हुशार आहेत, असे ते म्हणाले होते. काय प्रकरण आहे हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारताने ही बंदी उठवली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले होते की आमची प्राथमिकता आपल्या देशात भरपूर साठा ठेवणे आहे, परंतु ज्या देशांमध्ये कोरोना विषाणू सर्वाधिक प्राणघातक झाला आहे, त्यांना औषधे पाठविली जातील. संबंधित -  कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, पोलिसांचा शोध सुरू केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या