नवी दिल्ली, 30 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन जाहीर केला. 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन 21 दिवसांचा आहे.14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाचे (Corornavirus) संक्रमण थांबवण्यासाठी हे लॉकडाऊन गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. दरम्यान लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे, अशा काही बातम्या पुढे येत होत्या. याबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही सोमवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘ मी असे अहवाल वाचून हैराण झालो आहे. लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही’.
दरम्यान भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1000 पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे भारतातील धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी घरात राहणे आणि स्वत:चा बचाव करणे हा एकमेव पर्याय आहे. गरोदर महिलेला विमानात त्रास, दोन तासांच्या प्रवासात कोल्हापूरचा तरुण ठरला देवदूत कोरोनाचं थैमान, 12 तासांत 12 नवे रुग्ण राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 215वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी 12 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. पुण्यात 5, मुंबई 3, नागपूर 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारपर्यंत 203 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत आणखी 05 रुग्णांचा समावेश झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. पिंपरीत कलम 144चं उल्लंघन, टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 13 जणांना बेड्या