आकाश आणि जमिनच नाही तर पाण्यावरही या आण्विक युद्धाचा परिणाम होताना दिसेल. या हल्ल्यामुळे 5 ते 15 टक्के जलजीवन भूकबळीने मरतील. तर पर्यावरणात 16 ते 36 टेराग्राम काळा कार्बन तयार होईल.
कराची 16 सप्टेंबर : पाकिस्तानातल्या (Pakistan) सिंध प्रांतांत (Sindh Province) हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी 218 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रांतात हिंदू (Minority Hindu Community) समुदायाच्या शाळेत प्राचार्यांविरुद्ध ईश निंदेचा (Blasphemy) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिथे दंगल भडकली होती. मंदिरांशिवाय शाळेचंही मोठं नुकसान झाल्याचा आरोप होतोय. पाकिस्तानात ईश- निंदा हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जातो. या शाळेतल्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने ही तक्रार केली होती. महिला प्राचार्यांनी इस्लाम विरुद्ध वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय. या घनेनंतर दंगल भडकली आणि अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली. तसच काही घरांवरही दगडफेक करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अल्पसंख्याक हिंदू समुदाय घाबरला आहे. तर पोलिसांनी हस्तक्षेप करून दंगल नियंत्रणात आणल्याचं सांगितलं जातंय. 32 वर्षांच्या तरुणाला 81च्या म्हाताऱ्याचा गेटअप देणाऱ्या ‘बिल्लू बार्बर’ला अटक मलालावर होतेय सोशल मीडियावरून टीका सर्वात कमी वयात शांततेचं नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या युसुफजई मलाला आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिनं काश्मीरवरून केलेल्या टि्वटनंतर अनेकांनी मलालाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थिती केला आहे. मलालाने म्हटलं होतं की, काश्मीरमधील मुली शाळेला जाऊ शकत नाहीत यामुळं आपण निराश आहे. काश्मीरमधील परिस्थितीमुळे तीन मुलींनी शाळेतील परीक्षेला मुकल्याचं आपल्याला सांगितलं असा दावाही मलालाने केला आहे. मलालाच्या ट्विटनंतर अनेकांनी सुनावलं आहे. भारताची नेमबाजपटू हिना सिद्धू भडकली असून तिनं तुला एवढचं काही करायचं असेल तर पहिल्यांदा पाकिस्तानला जाऊन दाखव असं म्हटलं आहे. स्वत:चा देश सोडून गेल्यावर परत देशात आली नाहीस असं हिनाने म्हटलं आहे. PHOTO : चंद्रावर आता होऊ लागली संध्याकाळ, विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर हिना सिद्धुने पाकिस्तानात कशा प्रकारे शाळेत गेल्यावर तालिबान्यांनी हल्ला केला याची आठवण करून देताना मलालाने शिक्षणासाठी संघर्ष करताना प्राणही गमावला असता पण दुसऱ्या देशात निघून गेली. तिथेच राहणाऱ्या मलालाने पहिल्यांदा पाकिस्तानला जाऊन दाखवावं असं ट्विट हिनाने केलं आहे. कर्नाटकच्या खासदार शोभा करंदालजे यांनीही मलालाच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, नोबेल विजेत्या मलाला हिला विनंती आहे की तिने पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचाही विचार करावा. त्यांना पाकिस्तानात धर्मांतर, छळ सहन करावा लागत आहे. काश्मीरमध्ये लोकांचा आवाज दाबला जात नाही तर विकासासाठी पुढे वाटचाल सुरू आहे. मोदी सरकारला धक्का, GDPचा दर कमी झाल्याची RBI गव्हर्नरची कबुली मलालानं संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागणी केली होती की, काश्मीरमध्ये शाळा सुरू होण्यासाठी मदत करावी. तसेच काश्मीरमध्ये शांतता निर्माण यावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढं यावं आणि तिथल्या लोकांच्या समस्लाय सोडवाव्या. अनेक काश्मीरींनी नाराजी व्यक्त केली आहे असंही ती म्हणाली होती.