चांद्रयान -2 च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान विक्रम लँडरचा इस्रोच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला.
यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 21 - 22 सप्टेंबरला तर ही आशा मिटली जाईल. कारण यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पूर्ण अंधार होणार आहे.
विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी नासा इस्रोला मदत करत आहे. चांद्रयान -2 च्या ऑर्बिटर आणि लँडरशी संपर्क साधण्यासाठी डीप स्पेस नेटवर्कच्या तिन्ही केंद्रांमधून प्रयत्न सुरू आहेत.
विक्रम लँडरमधली यंत्रणा आता पूर्णपणे बंद झाल्याचीच शक्यता आहे. पण नक्की कशामुळे विक्रमचा संपर्क तुटला आहे ते कळू शकलं नाही.
विक्रम लँडरमधल्या काही उपकरणांमुळे अजूनही संपर्काची शक्यता आहे, असं काही वैज्ञिनिकांना वाटतं आहे. चंद्रावर अजून काहिसा उजेड असेपर्यंत तरी आशा कायम आहे.