32 वर्षांच्या तरुणाला 81च्या म्हाताऱ्याचा गेटअप देऊन परदेशी पळून जायला मदत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टला अटक

32 वर्षांचा तरुण चक्क 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष धारण करून अमेरिकेत पसार होण्याच्या तयारीत होता, त्याला कसं पकडलं याची बातमी तुम्ही वाचली असेल, आता त्याच्या मेकअप आर्टिस्टलाही पकडलंय

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 08:45 PM IST

32 वर्षांच्या तरुणाला 81च्या म्हाताऱ्याचा गेटअप देऊन परदेशी पळून जायला मदत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टला अटक

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : गेल्या आठवड्यात एक तरुण आरोपी म्हाताऱ्याचं रूप घेऊन खोट्या पासपोर्टवर अमेरिकेत पळून जात असल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. बेमालूमपणे म्हाताऱ्याचा गेट अप वठवला तरी दिल्ली एअरपोर्टवरच्या दक्ष सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकलं आणि संशय आल्याने चौकशी केली. त्यावेळी या त्याचं बिंग फुटलं. या 32 वर्षांच्या माणसाला 81 च्या म्हाताऱ्याचा गेटअप देऊन परदेशी पळून जायला मदत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टलाही आता अटक करण्यात आली आहे.

नेमकं झालं काय?

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या सोमवारी (9 सप्टेंबर) एक धक्कादायक घटना घडली. एक 32 वर्षांचा तरुण चक्क 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष धारण करून अमेरिकेत पसार होण्याच्या तयारीत होता.  प्रवासापूर्वी आवश्यक असणाऱ्या परवानग्याही त्यानं मिळवल्या होत्या. एवढं करूनही त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. कारण त्याच्या संशयास्पद हालचालींवरून CISFच्या जवानांना संशय आला आणि विमान उड्डाण भरण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

या एका 32 वर्षांच्या आरोपीला परदेशी पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्या मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. या मेकअप कलाकाराने जयेश पटेल नावाच्या आरोपीला असा बेमालूम मेकअप केला की तो ओळखता येणार नाही असा 81 वर्षांचा म्हातारा दिसू लागला. शमशेर सिंग असं अटक झालेल्या मेकअपमनचं नाव आहे. पैशासाठी आपण हे काम केल्याचं त्यानं कबुल केलं आहे.

हे वाचा - PM मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले!

Loading...

शमशेर सिंगने त्याच्यातल्या कलाकाराची जादू अशा अनेक गैरकामांसाठी वापरली असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्याने 10 संशयितांचा मेकओव्हर केला आणि त्यांना पळून जायला मदत केली. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. एका एजंटसाठी हा शमशेर सिंह काम करायचा. शमशेरचं प्राथमिक शिक्षण झालंय आणि झटपट पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यानं या कामांना होकार दिल्याचं कळतं.

वाचा - मोबाईल हरवला आता चिंता नको! सरकार शोधणार तुमचा फोन

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यानं सगळ्या प्रकाराची घडाघडा कबुली दिली. त्याच्या घरातून केस रंगवायची आणि इतर कॉस्मेटिक्स जप्त करण्यात आली आहेत. शमशेरने ज्या तरुणाला म्हातारा बनवला त्याचं नाव जयेश पटेल असून तो अहमदाबाद येथील रहिवासी आहे.

(वाचा : झीरो डिग्री बारमध्ये रात्रभर लहान मुला-मुलींचा धिंगाना, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा)

जयेश पटेल हा अमरीक सिंह या नावानं न्यूयॉर्कला जात होता, अशी माहिती CISFनं दिली. यासाठी त्यानं म्हाताऱ्याचं सोंग घेतलं आणि व्हीलचेअरवरून तो विमानतळावर पोहोचला. अंतिम टप्प्यात सुरक्षा रक्षकांकडून तपासणी सुरू असताना CISFनं त्याला रोखलं आणि व्हीलचेअरवरून उठवण्यास सांगितलं, तर त्यानं थेट नकार दिला. यानंतर बराच वेळ त्याची कसून चौकशी करण्यात आली. पण त्याच्याकडून योग्य उत्तरं मिळत नव्हती. यावरून तपास अधिकाऱ्यांचा त्याच्यावरील संशय बळावला.

CISFनं सांगितलं की, पासपोर्टवर आरोपीची जन्मतारीख 1 फेब्रुवारी 1938 नमूद करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होऊ नये, यासाठी त्यानं केस पांढरे केले होते. शमशेरने त्याला असा गेटअप दिला होता. पण पटेलला नीट पारखून पाहिल्यानंतर त्याच्या त्वजेवरून तपास अधिकाऱ्यांना तो 81 वर्षांच्या म्हातारा असल्याचं वाटलं नाही. कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपी पोपटासारखा बोलू लागला. दुसऱ्या व्यक्तीच्या पासपोर्टवर अमेरिकेला जाण्याचा प्लॅन होता, असं त्यानं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं.

-----------------------------------------------

शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...