जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोदी सरकारला धक्का, GDPचा दर कमी झाल्याची RBI गव्हर्नरची कबुली

मोदी सरकारला धक्का, GDPचा दर कमी झाल्याची RBI गव्हर्नरची कबुली

मोदी सरकारला धक्का, GDPचा दर कमी झाल्याची RBI गव्हर्नरची कबुली

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. GDP चा 5 टक्के दर हा माझ्यासाठी धक्काच होता, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटलं आहे. CNBC TV 18 ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. GDP चा 5 टक्के दर हा माझ्यासाठी धक्काच होता, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटलं आहे. CNBC TV 18 ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली. देशाचा आर्थिक विकास दर सुधारण्यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. परदेशी गुंतवणुकीचा ओघ मागच्या वर्षीपेक्षा चांगला आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांची महागाई काही दिवसांनी कमी होईल. शहरात दूध आणि अंड्यांच्या किंमतींमध्ये मात्र वाढ झाली आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. 2020 च्या आर्थिक वर्षात GDP चा दर 6.9 वर नेण्याचं उद्दिष्ट आहे. पण GDP चे आकडे अंदाजापेक्षा कमी आहेत. त्यामुळेच GDP चा दर वाढवण्याला RBI चं प्राधान्य आहे. पुढच्या काही दिवसांत व्याजदरात कपात होणार का यावर ते म्हणाले, आत्ताच याबद्दल निर्णय घेता येणार नाही. आर्थिक वाढीमध्ये सगळ्यांनीच आपली भूमिका निभावली पाहिजे. ‘साहेबां’च्या दौऱ्यात भुजबळांची ‘दांडी’; अखेर शरद पवारांनीच केला खुलासा! डाळी आणि भाज्यांच्या किंमती अपेक्षेप्रमाणेच आहेत. काही उत्पादनांच्या वाढलेल्या किंमती ग्रामीण भागाच्या आर्थिक वाढीसाठी चांगल्याच आहेत, असं निरीक्षण शशिकांत दास यांनी नोंदवलं.अंडी आणि दुधाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा शहरांवर परिणाम होतो, असंही ते म्हणाले. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येणार आहे. सौदी अरामको कंपनीच्या तेलसाठ्यांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांचा परिणाम पूर्ण जगावरच होणार आहे. यामुळे चलनवाढ होण्याची शक्यता आहे. भारतावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे हे समजायला काही अवधी लागेल, असंही त्यांचं म्हणणं आहे. ========================================================================================= बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: economy , rbi
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात