JOIN US
मराठी बातम्या / देश / थरार! अंधारात समोर आला भलामोठा अस्वल, 10 मिनिटं झाली झटापट आणि...

थरार! अंधारात समोर आला भलामोठा अस्वल, 10 मिनिटं झाली झटापट आणि...

अस्वलाच्या रूपात स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर पाहून हा तरुण डगमगला नाही, जागचा हललाही नाही, तर त्याने निडरपणे अस्वलाशी झुंज दिली.

जाहिरात

अखेर अस्वल जंगलात पळाला आणि तरुण कसाबसा घरी पोहोचला.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 28 जून : जंगलांच्या शेजारील गावांना प्राण्यांपासून मोठा धोका असतो. दिवसाढवळ्या संरक्षण करणं सोपं जातं, मात्र अंधार पडू लागल्यावर एखाद्या ठिकाणी जंगली प्राणी असल्याचा अंदाज गावकऱ्यांना येत नाही. अशावेळी अनेक दुर्घटना समोर येतात. अशीच एक घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून समोर आली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला, मात्र तो घाबरला नाही, तर त्याने अस्वलाला पळवून लावलं. कटघोरा वनविभागातील पसान क्षेत्राच्या सेमरा सर्कलमधील ही घटना आहे. अस्वलाच्या रूपात स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर पाहून हा तरुण डगमगला नाही, जागचा हललाही नाही, तर त्याने निडरपणे अस्वलाशी झुंज दिली. अखेर अस्वल जंगलात पळाला आणि तरुण कसाबसा घरी पोहोचला. वनविभागाच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

छत्तीसगडचा कोरबा जिल्हा वन्यजीवांच्या दृष्टीने समृद्ध आहे. येथील तिलईडांड जंगलात बनखेता गाव वसलेलं आहे. या गावातील 36 वर्षीय रहिवासी बनसराम पंडो हा सकाळच्या सुमारास बाहेर गेला होता. संध्याकाळी साधारण सात वाजता तो भरपावसात घरी यायला निघाला. जंगलात चालत असतानाच अचानक अस्वलाने त्याच्यावर झडप घातली. बनसरामने न घाबरता अस्वलाशी झुंज दिली. जवळपास 10 मिनिटं दोघांमध्ये झटापट झाली. अखेर बनसरामने आपला जीव वाचवला आणि अस्वल जीव मुठीत घेऊन जंगलात मागच्या मागे पळाला. एक कप चहा, कायदे जाणून घ्या! ‘असा’ आहे हा वकील चहावाला परंतु या हल्ल्यात बनसरामच्या पायांना दुखापत झाली. रक्ताने माखलेले पाय घेऊन तो कसाबसा घरी पोहोचला. त्याच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जाणं गरजेचं होतं. परंतु जंगलात पाऊस आणि अंधार पडला होता. त्यामुळे गावच्या सरपंचांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागालाही भरपावसात टेकडीच्या माथ्यावर जाता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी जखमी तरुणाला मुख्य रस्त्यावर घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने संजीवनी एक्स्प्रेसमधून त्याला पसानच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या