नाचत असताना व्यक्ती
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 13 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता उत्तरप्रदेशातील अयोध्येत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाचताना करताना एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. हा व्यक्ता ‘खईके पान बनारस वाला’ या गाण्यावर नाचत होता. यावेळी त्याच्यासोबत एक लहान मुलगाही नाचत होता. त्यांना नाचताना पाहून उपस्थित तरुण आणि काही महिला हसतही होत्या. मात्र, यावेळी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
नाचत असताना हा व्यक्ती अचानक जमिनीवर पडला, आणि त्याचा मृत्यू झाला. यावेळी जवळचे लोकांनी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पानी शिंपडले. पण तरी तो व्यक्ती उठला नाही. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना अयोध्येच्या पटरंगा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. रुद्रौली तालुक्यातील एका गावात एका तरुणाची 15 तारखेला वरात जाणार होती. मात्र, याआधी मंगळवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास लग्नाच्या आधीचा एक विधी होता. त्यामुळे याठिकाणी नाचगाणे सुरू होते. या नाचगाण्यादरम्यान, शेजारील दिलशाद नावाचा व्यक्तीही नाचत होता. आजूबाजूचे लोक त्यांच्या नाचण्याचा व्हिडिओ तयार करत होते. मात्र, नाचत असताना अचानक त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. यानंतर त्यांच्या नातेवाईक आणि स्थांनिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.