JOIN US
मराठी बातम्या / देश / COVID-19: भारताने ब्रिटनला टाकलं मागे, मुंबई, दिल्ली सर्वात धोकादायक!

COVID-19: भारताने ब्रिटनला टाकलं मागे, मुंबई, दिल्ली सर्वात धोकादायक!

गेल्या सात दिवसांपासून देशात दररोज 10 हजारांच्या आसपास नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जून: कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात धोकादायक वाढ होत आहे. आज देशात तब्बल 9,996 नव्या रुग्णांची भर पडली. एकाच दिवसात आत्तापर्यंत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तर देशातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,93,394 एवढी झाली आहे. म्हणजेच संख्या तीन लाखांच्या जवळ गेली आहे. हा आकडा ब्रिटनपेक्षाही जास्त असून भारताने त्या देशालाही मागे टाकले आहे. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत 2,91,409 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात मुंबई आणि दिल्ली ही धोकादायक शहरं बनली असून देशातल्या एकूण संख्येत या दोन शहरांची संख्या सगळ्यात जास्त आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांची मृत्यू संख्या 8 हजारांवर पोहोचली असून गेल्या 24 तासांमध्ये 357 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात काय आहे स्थिती? आज राज्यात 3607 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे  एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 648 म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर आज  152 नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3590वर गेला आहे. आज 1561 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात 46078 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज झालेली रुग्णांची वाढ ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ आहे. मुंबईत 97 तर मीरा भाईंदर मध्ये 9 मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात आज दिवसभरात 268 जणांना कोरोनाची लागण झाली तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिल्ली आज 1,877 नवे रुग्ण सापडले. तर मृत्यूसंख्या 1,085 पोहोचली आहे. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह भारतातील मृतांचा आकडा 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून रोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असले तरी निरोगी रुग्णांची संख्या देशात वाढत आहे. हे वाचा - बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार, 2 रामबाण औषधींचा शोध संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या