मुंबई, 14 फेब्रुवारी : शिव तांडव स्तोत्र ही रचना उच्चारण्यासाठी फार कठीण आहे. संस्कृत भाषेचं चांगलं ज्ञान असणाऱ्यांनाही अनेक दिवस सराव करून न चुकता शिव तांडव म्हणणं कठीण वाटतं. मात्र, लखनौमधील एका चार वर्षांच्या मुलीला ही कठीण गोष्ट फारच सोपी वाटत आहे. सौंदर्या पांडे असं नाव असलेली ही चिमुकली तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात शिव तांडव म्हणते. तिला शिव तांडव स्तोत्रातील 18 श्लोक पाठ झाले आहेत. इतकंच नाही तर सौंदर्या दोन्ही हातांनी लिहू शकते. त्यामुळेच तिला ‘वंडर गर्ल’ या नावानं ओळखलं जात आहे. याशिवाय, तुम्हाला गंगा नदी प्रणाली समजून घ्यायची असेल तर तुम्ही सौंदर्याला प्रश्न विचारू शकता. फक्त गंगाच नाही तर देशातील प्रत्येक नदी कुठे उगम पावते आणि ती पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते याची संपूर्ण माहिती सौंदर्याला सांगता येते. सामान्यपणे बघितलं तर, चार वर्षांच्या मुलांना हातात पेन्सिलही नीट धरता येत नाही. लखनौमधील सौंदर्या मात्र, या वयात लोकांना मूलभूत हक्कांचीही माहिती देत आहे. ‘ही’ महिला म्हणजे माणुसकीचं प्रत्यक्ष उदाहरण; चक्क अमेरिकेतील नोकरी सोडली आणि.. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद एका विशेष मुलाखतीत सौंदर्यानं सांगितलं की, तिचं नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ तसेच ‘वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेल आहे. शाळेतील वर्गातही ती नेहमी प्रथम क्रमांक मिळवते. लहान वयात सर्व माहिती असल्याबद्दल ती सांगते की, तिच्या पालकांनी तिला सर्व काही शिकवलं आहे. इतकेच नाही तर न्यूज18 लोकल टीमसमोर तिनं, 150 देशांचे राष्ट्रध्वज आणि त्यांच्या राजधान्या सांगितल्या. याशिवाय ती गणितातील 40 पर्यंतचे पाढेदेखील म्हणून दाखवते. ‘या’ जोडप्याने चक्क रुग्णालयात केलं लग्न, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक काय आहे रहस्य? सौंदर्याची आई गुंजा पांडे यांनी सांगितलं की, गर्भसंस्काराचा मुलींवर मोठा प्रभाव पडला आहे. ती गर्भात असताना त्यांनी नियमित देवाची पूजा केली होती. रामायण, महाभारत असे धर्मग्रंथ वाचले होते. गायत्री मंत्राचंही पठण त्यांनी केलं होतं. याचा थेट परिणाम आपल्या मुलीच्या मनावर झाला आहे. हेच कारण आहे की, एवढ्या लहान वयात तिचं लवकर पाठांतर होतं. सौंदर्याचे वडील आशुतोष कुमार पांडे यांनीही तिला फार चांगली शिकवण दिली आहे.