विरोधकांची एकजूट, आघाडीला नवीन नाव
बंगळुरू, 18 जुलै : बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीत आघाडीच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance)असल्याचं सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं, ज्यावर बहुतेक विरोधकांनी सहमती दर्शवली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या नावाबाबत अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, पण बहुतेक पक्षांनी या नावाचं समर्थन केलं आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपच्याविरुद्ध सगळे विरोधक एकत्र यायचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. याआधी जून महिन्यात बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक झाली होती.
विरोधकांनी एकत्र निवडणूक लढून मतांचं विभाजन टाळण्यासाठी आणि भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.
बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.. ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होणार आहेत. तर या बैठकीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचं स्नेहभोजन झालं. यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. हे तर कट्टर भ्रष्टाचारी संमेलन, विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा निशाणा विरोधकांच्या बैठकीतील पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, द्रविड मुनेत्र कडगम, जनता दल (यूनायटेड), उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रीय जनता दल, इंडियन युनियन मुस्लीम लीग, जम्मू एवं कश्मीर राष्ट्रीय सम्मेलन, झारखंड मुक्ति मोर्चा, मरुमलारची द्रविड मुनेत्र कडगम, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (भारत), विदुथलाई चिरुथिगल काची, असम जातीय परिषद, गोवा फॉरवर्ड पार्टी, केरल काँग्रेस, भारत क्रांतिकारी मार्क्सवादी पार्टी, आंचलिक गण मोर्चा, केरल काँग्रेस (जेकब), राष्ट्रवादी काँग्रेस केरळ, भारत किसान एवं श्रमिक पार्टी