दिल्ली, 18 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअर इथं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना संबोधित केलं. तसंच बंगळुरूत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवरही मोदींनी निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात काही पक्ष जातीयवादाचे विष विकत आहेत आणि हे लोक आज बंगळुरूत एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा घराणेशाहीची टीका करताना म्हटलं की, घराणेशाहीचे कट्टर समर्थक एकत्र येत आहेत. हे कट्टर भ्रष्टाचारी संमेलन होत आहे. हे लोक कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवत आहेत. काही लोकांनी आपली दुकाने उघडली, निवडणुकीसाठी ही दुकाने उघडली आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, 12 वेळा जिंकली होती विधानसभा निवडणूक बंगळुरूत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आहे. त्यावरून टीका करताना मोदी म्हणाले की, गाइत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है, माल कुछ है हे गाणं 2024 साठी 26 झालेल्या राजकीय पक्षांसाठी फिट बसतं. अवधी भाषेतली ही कविता बंगळुरुत आयोजित केलेल्या बैठकीतील पक्षांसाठी चपखल बसते. कारण या पक्षांची स्थिती अशीच आहे. ते गातात काही वेगळं, परिस्थिती वेगळी आहे, लेबल वेगळं आणि माल तिसराच आहे. हे लोक जनतेसाठी नाही तर आपल्या हितासाठी एकत्र आले असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली. बंगळुरूत एकत्र आलेल्या या लोकांनी एका चेहऱ्यावर अनेक मुखवटटे लावले आहेत. काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे विकास देशाच्या दुर्गम भागात पोहोचत नाही. जनतेला यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. ज्या कुटुंबातील सर्व लोक जामीनावर बाहेर असतील त्यांच्याबाबत काय सांगावं. त्यांना लोकशाहीला बांधून ठेवायचं होतं. त्यांच्यासाठी कुटुंब सर्वात वरती आहे असं म्हणत घराणेशाहीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.