JOIN US
मराठी बातम्या / देश / Lockdown:  शाब्बास! कॅन्सरच्या रुग्णाला औषध देण्यासाठी तरुणांनी केला 700 किमी बाईकवरून प्रवास

Lockdown:  शाब्बास! कॅन्सरच्या रुग्णाला औषध देण्यासाठी तरुणांनी केला 700 किमी बाईकवरून प्रवास

लॉकडाऊनमुळे त्यांना औषध मिळणं बंद झालं. जास्त दिवस झाले तर त्याचा त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू 26 एप्रिल: लॉकडाऊनमुळे देशातले बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. लाखो मजूर ठिकठिकाणी अडकले आहेत. अशा काळात ऐकमेकांना मदत केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. केरळमधल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला औषध पोहोचविण्यासाठी बंगळुरच्या तीन युवकांनी बाईकवरून 700 किमी लांब प्रवास करत त्यांना औषध पोहोचवलं. या युवकांच्या या कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. केरळच्या कुन्नूर जिल्ह्यात निवृत्त कर्नल एम.एम.के. नाम्बियार राहतात. ते कॅन्सर पेशंट आहेत. त्यासाठी लागणारे औषध त्यांना त्यांची सून बंगळूरूहून नियमित पाठवत असते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना औषध मिळणं बंद झालं. त्यांनी स्थानिक आणि जिल्ह्याच्या ठिकाणी औषध मिळतं काय याची चौकशी केली मात्र त्यांना ते औषध भेटलं नाही. जास्त दिवस झाले तर त्याचा त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती होती. त्यांच्या सुनेलाही याची चिंता होती. त्यांनी थेट बंगळुरू पोलिसांना मदतीची विनंती केली. सगळी माहिती घेतल्यानंतर त्यासाठी बंगळुरू पोलिसांनी ‘राइडर्स रिपब्लिक’ या बाईकर्स ग्रुपची मदत घेतली. या ग्रुप मधले काही युवक हे ‘ Right to Save Lives’ या मोहिमेशी जोडले गेले आहेत. हे वाचा -  डोळ्यांमध्ये तब्बल 21 दिवस राहू शकतो कोरोना, धोकादायक व्हायरसबद्दल नवी माहिती या बाईकर्सनी बंगळूरू ते केरळ आणि पुन्हा बंगळूरू असा 700 किमीचा अवघड प्रवास पूर्ण केला आणि ते औषध केरळ पोलिसांच्या स्वाधीन केलं. केरळ पोलिसांनी ते औषध नाम्बियार यांना पोहोचवलं. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. या मदतीसाठी या ग्रुपमधले युवक पैसे घेत नाही. एक सामाजिक काम म्हणूनच ते हे कार्य करतात. या ग्रुपचं आणि युवकांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हेही वाचा - देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, टॉप 5 मध्ये या राज्यांचा समावेश कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस घेतोय कमी जीव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या