नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची 1990 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 26 हजारांचा टप्पा पार केला आहे. भारतात आजपर्यंत कोरोनाचे एकूण 26 हजार 496 रुग्ण आढळले आहेत. तर 804 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.
देशात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळली आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर गुजरात आणि राजधानी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1-महाराष्ट्र -7 हजार 628
2-गुजरात -3 हजार 071
3-दिल्ली -2 हजार 625
4-मध्य प्रदेश -2 हजार 096
5-राजस्थान -2 हजार 083
6-तामिळनाडू -1 हजार 821
7-उत्तर प्रदेश-1 हजार 793
8-आंध्र प्रदेश -1हजार 061
PM मोदींनी साधला देशवासियांशी संवाद
देशभरात सुरू केलेल्या लॉकडाऊनला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग अजून कमी होऊ शकलेला नाही. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'द्वारे देशभरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. देशातील जनता कोरोनाशी लढा देत आहे, कोरोनाविरोधात भारताचा लढा आदर्शवत आहे. शेतकरी कोरोनाविरोधात लढत आहेत...जनतेला अन्न पुरवत आहेत. नागरिकांनी खूप मोठा त्याग केला आहे,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी झाला कांदा व्यापारी, 3 लाख रु. खर्च करुन मुंबईहून पोहोचला गावीकोरोना लढ्याची माहिती देत असताना नरेंद्र मोदी यांनी सरकारने तयार केलेल्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली आहे. 'कोव्हिड वॉरिअर्स' या नावाने सरकारने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'या प्लॅटफॉर्मवर आपण विविध घटकांना एकमेकांशी जोडलं आहे. यामध्ये स्थानिक प्रशासन, डॉकर्स, आशा वर्कर्स यांचा समावेश आहे. त्यातून कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येकजण आपआपलं योगदान देत आहे. तुम्हीही covidwarriors.gov.in सोबत जोडले जा,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus