JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आराम करत होता बिबट्या, नागरिकांची पळापळ

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आराम करत होता बिबट्या, नागरिकांची पळापळ

लॉकडाऊन लागू केल्यापासून अनेक प्राणी रस्त्यांवर येऊन बागडत आहेत. अगदी मोर, गेंडा आता तर बिबट्याही रस्ते आणि घराच्या छतावर फिरत असल्याचे दिसले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैद्राबाद, 15 मे : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेक प्राणी रस्त्यांवर आले आहे. मुंबईत तर मोरही दिसले होते. रस्त्यांवर व नॅशनल हायवेवर लोक आणि वाहनांची गर्दी नसल्याने प्राणी मस्त फिरत, बागडत होते. गुरुवारी तर हैद्राबादमध्ये एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. रस्त्यावर आराम करीत असलेल्या बिबट्याला बघून लोकांची धांदल उडाली. यादरम्यान काहींना खरचटलं ही आहे. रस्त्यांवर फिरत असलेल्या बिबट्याला पाहून स्थानिकांनी पोलीस आणि वन विभागाला याची सूचना दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन विभागाच्या टीमने बिबट्याला पकड्याचा खूप प्रयत्न केला. ते बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करीत असताना मोठी गर्दी जमा होऊ लागली. यानंतर बिबट्या स्टेशनजवळ धावला आणि एका शेतात घुसला. घरांच्या छतावर फिरत होता तो हा तोच भाग आहे जेथे काही दिवसांपूर्वी ‘मार्जार’ प्रजातीतील निशाचर प्राणी मसन्याऊदचे (सिव्हेट कॅट) फिरताना दिसली होती. या भागात जंगली प्राण्यांचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लोकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगातील बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर लोकांपेक्षा प्राणी-पक्षी दिसू लागले आहेत. अगदी जंगली प्राणीसुद्धा रस्त्यावर दिसत आहेत. नोएडामध्ये बिबट्या, चंडीगडमध्ये नीलगाय तर मुंबईमध्ये चक्क रस्त्यावर मोर दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये चक्क एक गेंडा रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाला. हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचं समजतंय. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFF) अधिकारी प्रवीण कसवान यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. हे वाचा - दिल्लीहून आलेल्या प्रवाशांचा क्वारंटाईन व्हायला नकार; सरकारने परत केली पाठवणी गर्लफ्रेंण्डसोबत बेटावर अकडला दिग्गज खेळाडू, ब्लॅकमेलरच्या हाती लागला SEX VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या