बुएनोस आइरेस, 14 मे : कोरोनामुळं (Coronavirus) प्रत्येक जण घरात कैद आहे. यामुळं प्रत्येकालाच कठिण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अशातच आर्जेन्टिनाचा दिग्गज खेळाडू इझक्यूएल लव्हझीला एका भलत्याच संकटाला तोंड द्यावे लागत आहे. इझक्यूएल सध्या आपल्या गर्लफ्रेंण्डसोबत कॅरेबियन बेटावर अडकला आहे. दरम्यान इझक्यूएलचे गर्लफ्रेंण्डसोबतचे सेक्स व्हिडीओ एका तरुणाच्या हाती लागले आहेत. एवढेच नाही तर ही व्यक्ती इझक्यूएलला ब्लॅकमेलही करत आहे. इझक्यूएल लव्हझी आर्जेन्टिनाचा प्रसिद्ध खेळाडू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं ब्लॅकमेल केल्याची तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालेल्या अर्जेटिनाच्या फॉरवर्ड लव्हझीने आपल्या तक्रारीत असे म्हटलं आहे की, जर त्यानं प्रत्येक व्हिडीओसाठी पाच हजार डॉलर्स किंवा सुमारे चार लाख रुपये दिले नाहीत तर त्याचे सेक्स व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर टाकून व्हायरल केले जातील. वाचा- भर दुकानात महिलेनं केलं हस्तमैथून, VIDEO व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई
वाचा- Coronavirus : ‘हस्तमैथुन करा’, अमेरिकेत सरकारने नागरिकांना दिला सल्ला कोरोनामुळं सध्या आर्जेन्टिनामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळेच लव्हझी आपली पार्टनर ब्राझीलची मॉडेल आणि अभिनेत्री नतालिया बोर्जेसमवेत कॅरेबियन बेटांवर वेळ घालवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नतालियाला सोशल मीडिया अकाउंटवरही धमक्या येत आहेत.
ऑलिम्पिक विजेता आहे इझक्यूएल लव्हझी 2007 पासून आर्जेन्टिनाकडून चिलीविरूद्ध पदार्पण केलेल्या लव्हझीमुळं 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याच्या संघाला सुवर्णपदक जिंकता आले होते. या व्यतिरिक्त त्याने 2014 फिफा विश्वचषक आणि 2015 कोपा अमेरिकाच्या अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी केली. मात्र, 2015 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होते. आर्जेन्टिनाकडून लव्हझीनं एकूण 9 सामने खेळले आहेत, यात त्यानं 9 गोल केले आहेत. वाचा- सावधान! आता SEX ही सुरक्षित नाही?, शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना