कोची, 28 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ होत आहे. या सगळ्यात अशी काही प्रकरणे समोर येत आहेत, ज्यांनी सरकार आणि डॉक्टरांची चिंता वाढवली आहे. असाच एक प्रकार कोचीमध्ये (Kochi) घडला. येथील युवकाचे कोरोना रिपोर्ट तब्बल 19 वेळा पॉझिटिव्ह आले. दरम्यान आता युवकाची प्रकृती स्थिर असून त्याचा 20वा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं 41 दिवसांनी या युवकाला घरी जाता आले. हा रुग्ण गेल्या आठवड्यात लंडनवरून परतला होता. मलप्पुरम येथे राहणारा हा युवक लंडनवरून शारजाहला गेला आणि त्यानंतर भारतात पोहचला. भारतात परतल्यानंतर मात्र त्याच्यात कोरोनाची लक्षणं दिसली. 18 मार्च रोजी या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर थॉमस मॅथ्यू यांनी सांगितले की, 19वेळा या रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्याच्या सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. मात्र गेले दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे, त्यामुळं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा- माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही; बारामतीत घडली घटना ग्रीन झोन केरळमध्ये मिळतायत कोरोना रुग्ण केरळ सध्या ग्रीन झोन म्हणजेच जवळजवळ कोरोनामुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे. मात्र येथे पुन्हा कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. केरळमधील इडुक्की आणि कोट्टयम येथे तब्बल 11 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, यांच्या संपर्कात आलेल्या 7 जण संशयित रुग्ण आहेत. रुग्णांमध्ये एक डॉक्टर आणि 2 नर्सचाही समावेश आहे. वाचा- चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा आतापर्यंत देशात 886 लोकांचा मृत्यू देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढण्याची बाब महत्त्वपूर्ण आहे. सोमवारी देशात मृतांची संख्या 886 झाली. तर, संक्रमणाची संख्या 28 हजारहून अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्गाची 1463 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. वाचा- अंत्यसंस्कार केल्यानंतर सापडली महिला, रुग्णालयातूनच केला घरी फोन आणि… संपादन, संकलन-प्रियांका गावडे