JOIN US
मराठी बातम्या / देश / Air Crash: फक्त आठ दिवसांवर आलं होतं मुलाचं लग्न, रियासच्या आठवणीने आईने फोडला हंबरडा

Air Crash: फक्त आठ दिवसांवर आलं होतं मुलाचं लग्न, रियासच्या आठवणीने आईने फोडला हंबरडा

रियास हा दोन वर्षांपूर्वी आपल्या भावासोबत नोकरीसाठी दुबईला गेला होता. तिथे त्याचा आता जमही बसला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचं लग्न ठरवलं होतं.

जाहिरात

केरळमधल्या कोझिकोड इथं अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे Black Box सापडले आहेत. त्यामुळे थेवटच्या क्षणी नेमकं काय झालं ते आता कळणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोझिकोड 8 ऑगस्ट: कोझिकोड इथं झालेल्या विमान अपघातात मृत्यू मुखी पडलेल्यांच्या करुण कहाण्या आता बाहेर येत आहेत. अनेकांची स्वप्न भंग झाली आहेत. आधीच कोरोनाचं संकट. त्यामुळे झालेली आर्थिक ओढाताण, घरापासून लांब राहणं आणि त्यात हा अपघात त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. त्यातलाच एक मोहम्मद रियास. त्याचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मात्र या अपघातात त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे त्याच्या आठवणीने आईने फोडलेला हंबरडा अजुनही शांत झालेला नाही. रियास हा दोन वर्षांपूर्वी आपल्या भावासोबत नोकरीसाठी दुबईला गेला होता. तिथे त्याचा आता जमही बसला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचं लग्न ठरवलं होतं. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर तीन महिन्यांनी तो घराकडे परतत होता. त्याच्या घरी लग्नाची तयारीही सुरु होती. सगळी स्वप्न आणि नव्या आयुष्याची सुरुवात करायची अशी स्वप्न घेऊन तो परतत होता. मात्र विमान अपघाताने त्याची सर्वच स्वप्न आता अधांतरीच राहिली असून तो गेला असं त्यांच्या कुटुंबीयांना अजुनही वाटतच नाहीये. केरळमधल्या कोझिकोड इथं अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे Black Box सापडले आहेत. त्यामुळे थेवटच्या क्षणी नेमकं काय झालं ते आता कळणार आहे. दिवसभरात मोदी सरकारमधले दुसरे मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज घटनास्थळवर जाऊन पाहणी केली. जखमींना हवे ते सर्व उपचार देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुबईहून आलेल्या या विमानात 190 प्रवासी होते. त्यातल्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 149 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुलाने चोरला गहू, वडिलांनी अशी दिली शिक्षा की सगळ्यांच्या डोळ्यात आलं पाणी शुक्रवारी रात्री अपघात झाला होता. शनिवारी सकाळी अपघात झाला तिथलं दृश्य हे मनाचा थरकाप उडवणारं होतं. विमानाचे दोन तुकडे झाले होते. प्रवाशांचं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. खुर्च्या मोडून पडल्या होत्या.हे भयाण दृश्य पाहू सगळ्यांनाच रात्री काय झालं असेल याची कल्पना आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या