लखनऊ 8 ऑगस्ट: कुठल्या गुन्ह्याची कुठलही शिक्षा करावी याचे काही नियम आहेत कायदे आहेत. सर्व यंत्रणा त्यांच पालन करत असते. मात्र एका वडिलांनीच सर्व संकेत पायदळी तुडवत आपल्या पोटच्या मुलाला अशी क्रूर शिक्षा दिली की सगळ्यांनाच धक्का बसला. मुलाने घरातला एक किलो गहू विकला आणि पैसे खर्च केले त्यामुळे संतापलेल्या बापाने आपल्या मुलाला उलट टांगून बेदम मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. आगऱ्या जवळच्या खेड्यातली ही घटना आहे. गुड्डू खान असं आरोपी पित्याचं नाव आहे. खान यांचा मुलगा रमजानी याने घरात ठेवलेला 1 किलो गहू विकला आणि त्याचे आलेले पैसे खर्च केले. वडिलांना ही घटना कळताच त्यांचा पारा चढला. त्यांनी मुलाला उलटं टांगलं आणि जोरदार फटके मारले. ही घटना गावाबाहेर घडली होती त्यामुळे तिथे फारसे लोक नव्हते. त्यामुळे त्या वडिलांनी त्याला मारणं सुरुच ठेवलं होतं. तो मुलगा जोर जोराने ओरडत त्यांना मारू नका अशी विनवणी करत होता. मात्र ते थांबायला काही तयारच नव्हते. काळ आला होता पण… भरधाव ट्रक घुसला घरात, नंतर काय झालं पाहा VIDEO जेव्हा काही लोक तिथे जमले तेव्हा त्यांनी त्या मुलाची सुटका केली. पोलिसांनी त्या क्रुर बापाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याला योग्य ती शिक्षा करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्या मुलाचं आणि त्याच्या पालकाचं आता समुपदेशनही करण्यात येणार आहे. त्या मुलाला मानसिक धक्का बसला असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.