दिवसभरात मोदी सरकारमधले दुसरे मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह

दिवसभरात मोदी सरकारमधले दुसरे मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह

  • Share this:

नवी दिल्ली 8 ऑगस्ट: केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात कोरोनाची लागण होणारे ते दुसरे केंद्रीय मंत्री आहे. या आधी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी (Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मेघवाल यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

आपली प्रकृती चांगली असून उपचार सुरु आहेत. जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या आधी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चौधरी यांनीच याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

जैसलमेरचे खासदार असलेले चौधरी हे मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रात्री त्यांना ताप आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली.

चाचणीचे रिपर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काळजीचं कुठलंही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 8, 2020, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading