JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्यानं घेतला जगाचा निरोप, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही

कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्यानं घेतला जगाचा निरोप, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर चार महिन्यांच्या मुलावर आरोग्य कर्मचाऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले. आई वडिलांना त्यांच्या लेकराला शेवटचं पाहताही आलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोझिकोड, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वृद्ध व्यक्तींपासून ते लहान मुलांपर्यंतचा समावेश आहे. दरम्यान, केरळमध्ये एका 4 महिन्यांच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असलेले फोटो सध्या व्हायरल होत असून हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले. आई वडिलांना त्यांच्या या चार महिन्याच्या चिमुकल्या जीवाला शेवटचं पाहताही आलं नाही. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमध्ये सर्वात कमी वयाचा चिमुकला ठरला आहे. मुलाच्या मृत्यूआधी एक दिवस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि शुक्रवारी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून कोझिकोड इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. त्याला हृदयाचा आजार होता आणि त्यातच न्युमोनियाही झाला होता. कोझिकोड इथं चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी आरोग्य कर्मचारीसुद्धा त्यांचे अश्रू रोखू शकले नाहीत. मलप्पुरम इथल्या या चिमुकल्याच्या आई वडिलांचे सॅम्पलही घेण्यात आले आहेत. त्यांनी बाहेर कुठेही प्रवास केला नव्हता. मात्र मुलाला उपचारासाठी सारखं रुग्णालयात आणावं लागत होतं. हे वाचा : ‘ग्रामीण भागातील महिलांचा आकांत पाहा’, राज ठाकरेंच्या मागणीला विरोध मुलाला ओपन हार्ट सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची तब्येत बिघडल्यानंतर कोरोना टेस्ट करण्यात आली. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांपैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नव्हतं. आरोग्य कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर त्यांनाही सॅनिटाइज करण्यात आलं. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 447 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढणार; शहरं जागी व्हायला किमान जून उजाडणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या