काँग्रेस अध्यक्षांचा मुलगा आघाडीवर
बंगळुरू 13 मे : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कलही हाती आले आहेत. ज्यामध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. तर काँग्रेसही भाजपला टक्कर देताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. चित्तापूरमध्ये प्रियांक खर्गे आघाडीवर आहेत. तर, कुमारस्वामींचा मुलगा एच.डी. रेवन्ना पिछाडीवर आहे. 224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे. कर्नाटकात गेल्या 38 वर्षांपासून कोणत्याही सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. मागील निवडणुकीत जेडीएस आणि काँग्रेसने सरकार स्थापन केलं होतं. पण मध्यंतरीच्या काळात सत्तांतर होऊन भाजपने सरकार स्थापन केलं. Karnataka Election Results 2023 Live Updates : वाचा एका क्लिकवर यावेळी राज्यात विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले. सकाळी 8 वाजता राज्यभरात 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यामध्ये लढत असणार आहे. मात्र खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच असणार आहे. प्रमुख लढती शिग्गाव मतदारसंघ बसवराज बोम्मई - भाजप यासीर पठाण - काँग्रेस वरुण मतदारसंघ व्ही.सोमन्ना - भाजप सिद्धरमय्या - काँग्रेस चन्नपटना मतदारसंघ एच.डी.कुमारस्वामी - जेडीएस सी.पी.योगेश्वरा - भाजप कनकपुरा मतदारसंघ डी.के.शिवकुमार - काँग्रेस आर.अशोक - भाजप शिकारीपुरा मतदारसंघ बी.वाय.विजयेंद्र - भाजप जी.बी.मलातेश - काँग्रेस हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ जगदीश शेट्टर - काँग्रेस महेश तेंगीकाई - भाजप रामनगर मतदारसंघ इक्बाल हुसैन - काँग्रेस निखिल कुमारस्वामी - जेडीएस चिक्कमंगळुरू मतदारसंघ एच.डी.थमैय्या - काँग्रेस सी.टी.रवी - भाजप उडुपी मतदारसंघ यशपाल सुवर्ण - भाजप प्रसादराज कांचन - काँग्रेस दक्षत आर.शेट्टी - जेडीएस अठानी मतदारसंघ लक्ष्मण सवदी - काँग्रेस महेश कुमाथली - भाजप शशिकांत पडसलगी - जेडीएस