म्हैसूर, 01 मे : कर्नाटकात म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो वेळी सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या वाहनाच्या दिशेने एका महिलेने मोबाईल फेकल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिलेला शोधल असून त्यांनी सांगितलं की, मोबाईल फेकणाऱ्या महिलेचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोड शो वेळे भारतीय जनता पार्टीच्या एका महिला कार्यकर्तीच्या हातातून उत्साहाच्या भरात फोन निघाला. तिने कोणत्याही उद्देशाने असं केलं नव्हतं. फोन गाडीच्या बोनेटवर पडून खाली पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्यासोबत गाडीत असलेल्यांचं लक्ष त्याकडे गेलं. त्यांनी एसपीजी अधिकाऱ्यांकडे त्या वस्तूच्या दिशेने इशारा केला.
अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) अलोक कुमार यांनी सांगितलं की, पंतप्रधान एसपीजी सुरक्षेच्या कड्यात होते. ज्या महिलेचा फोन पंतप्रधान मोदींच्या वाहनावर पडला ती महिला भाजपची कार्यकर्ती होती. एसपीजीच्या लोकांनी तिचा फोन तिला परत केला आहे. उत्साहाच्या भरात महिलेने फोन फेकला. तिचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. Maharashtra APMC Election Result : बाजार समिती निवडणूक निकाल : रायगड ते गडचिरोली पाहा कोणाचं वर्चस्व? अलोक कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या रोड शो वेळी त्यांच्या वाहनावर मोबाईल फेकणाऱ्या महिलेचा शोद घेतला आहे. सोमवारी तिला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. घटना घडली त्यावेळी म्हैसूर कोडागूचे खासदार प्रताप सिंम्हा आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा तथा एसए रामदास यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लोकांकडे पाहून हात हलवत होते.
रोड शोच्या ठिकाणी पंतप्रधान मोदींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आणि भाजप समर्थक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका खास डिझाइन केलेल्या वाहनात होते. यावेळी रस्त्यात लोकांनी त्यांच्यावर फुलेही उधळली आणि भाजपचे झेंडेही फडकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांचे अभिवादन स्वीकारले. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. मतमोजणी १३ मे रोजी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आले आहेत. यात ते काही सभा आणि रोड शो करणार आहेत.