मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. रायगड ते गडचिरोली राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल नेमके कसे आहेत कोण गड राखणार हे समजून घेऊया. रायगड जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद विजय मिळवला आहे. या मविआमध्ये शेकापचे वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समितीवरील आपली सत्ता अबाधित ठेवली. रायगडमधील निकाल गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण 173 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शेकापने सर्वाधिक 95 जागा जिंकल्या आहेत. शेकापला एकूण अलिबाग- 16, मुरूड 12, कर्जत 10, खालापूर 15, पनवेल 15, रोहा 12, माणगाव 12, महाड 3 जागा मिळवण्यात यश आलं आहे. काँग्रेस 13, राष्ट्रवादी 20, ठाकरे गट 3 आणि शिंदे गट 20,भाजप 17 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत. एकूण 9 पैकी 8 बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा तर एका ठिकाणी भाजपची सत्ता
जुन्नर निकाल बाजार समितीत राष्ट्रवादीचीच सत्ता कायम ठेवण्यात यश आलं. 18 पैकी 13 जागांवर विजय तर विरोधी सर्वपक्षीय पॅनलला फक्त 5 जागा. समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीचा वापर.मध्यरात्री 2 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जेसीबी मधून भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा केला. जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजप-शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढवली तर सत्ताधारी गटाच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकारी पॅनल तयार केले होते. सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्यात दुरंगी लढत झाली. राज्यात एक मेकाच्या विरोधात कुस्ती खेळणारे शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटाने इथे मात्र दोस्ती करत एकत्र निवडणूक लढवल शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अपडेट एकूण 18 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्या पैकी 1 जागा ही ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असल्याने ती भाजप पुरस्कृत बिनविरोध करण्यात आली होती.युती आणि आघाडीला सम समान आठा - आठ जगा मिळाल्याने बाजार समितीवर कुणाचा अध्यक्ष बसणार हे मात्र आता दोन निवडून आलेले अपक्ष उमेदवार यांच्या हातात भवितव्य आहे. बीड- पाटोदा बाजारसमिती भाजपच्या ताब्यात बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठित आष्टी पाटोदा बाजार समितीचां गड राखण्यात यश आले. पाटोदा/शिरूर का.कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाचे आ.सुरेश धस यांच्या ताब्यात 18पैकी भाजपा 12 राष्ट्रवादी 6 ला मिळाल्या आहेत. वाशिमसह 4 बाजार समितीचे निकाल मंगरुळपिर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी एक हाती सत्ता मिळविली आहे.18 पैकी 17 जागांवर शेतकरी सहकार पॅनलने विजय मिळवला तर भाजपा, शिंदे गट, ठाकरे गट, वंचित च्या तालुका विकास आघाडी पॅनलला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता परिवर्तनाच्या मागे लागले होते मात्र माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी अखेर आपला गड राखत बाजार समिती वर बहुमत सिद्ध केलं. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे. तर भाजप पुरस्कृत पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.18 जागांपैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 07 जागांवर विजय मिळवला आहे.राष्ट्रवादी चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव व काँग्रेस आमदार अमित झनक याची सरशी दिसून आली तर या निवडणुकीत भाजप चे अनंतराव देशमुख व खासदार संजय धोत्रे यांना फटका बसला आहे… कारंजा बाजार समिती अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार प्रकाश डहाके प्रणित शेतकरी विकास आघाडीचा झेंडा फडकलाय. संचालक पदाच्या 18 जागांवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करून डहाकेंनी सहकार क्षेत्राचे आपलं वर्चस्व दाखवून दिले आहे.. या निवडणूकीतही माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर व भाजप आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी चे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या महाआघाडी पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांचा दणदणीत विजय झाला,चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर बच्चू कडू यांनी 18 पैकी 18 ही जागा जिंकत एकहाती सत्ता राखली,चांदुर बाजार, बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचा धुव्वा उडाला. बच्चू कडू यांनी 18 ही जागा निवडून आणत काँग्रेसला धूळ चाखली. जालना निकाल जालना जिल्ह्यातल्या परतूर, मंठा, आष्टी, अंबड आणि घनसावंगी या पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील पाच पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय.. तर घनसावंगीत राजेश टोपेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. वर्ध्याच्या आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप समर्थीत सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झालाय.भाजप समर्थीत सहकार पॅनेलने 18 पैकी 16 जागावर विजय मिळविला आहे तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. वर्ध्याच्या हिंगणघाट बाजार समितीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आघाडीच्या पॅनलचा वरचष्मा गडचिरोली निकाल गडचिरोली जिल्ह्यातील आणि राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आली. सिरोंचा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी रविवारी निवडणूक पार पडली होती. राञी उशीरापर्यंत झालेल्या मतमोजणीचे उशीरापर्यंत निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीने बाजी मारली.