बंगळुरू, 01 जुलै : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाबाधितांचे शव अयोग्यरित्या दफन केल्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाच खड्ड्यात 8 शव दफन केल्याचे दिसत आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं. व्हिडीओमध्ये, PPE किट घातलेले कर्मचारी जवळच उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका मागोमाग एक आठ मृतदेह एक मोठ्या खड्ड्यात टाकत होते. यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणार्या व्यक्तीनं असा दावा केला की ही घटना बल्लारी जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मृतांना अशी वागणूक का दिली जात आहे? असा सवाल विचारला जात आहे. तर, काहींनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाचा- कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह रुग्णाला असं तणावमुक्त ठेवतात डॉक्टर्स; पाहा VIDEO जनता दल पक्षानं आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यात त्यांनी सावध राहा, जर तुमच्या घरातल्या कोणाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यास भाजप सरकार कर्नाटकमध्ये असे मृतदेह फेकून देत आहे, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.
वाचा- कल्याण, डोंबिवली, ठाणेकरांना दिलासा; आजपासून मुंबईकडे 350 लोकल धावणार एकाच खड्ड्यात पुरले 8 मृतदेह एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, “आठही मृतदेह याच पद्धतीनं एकाच खड्ड्यात पुरण्यात आले”. बल्लारीचे उपायुक्त एस.एस नकुल यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली. दुसरीकडे कोरोनामुळे राज्यात मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा- COVID-19 मुलाला अन्न मिळावं म्हणून आई राहते उपाशी, कहाणी ऐकूण डोळ्यात येईल पाणी तर, कर्नाटक राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार झाली आहे. 24 तासांत राज्यात 947 नवीन रुग्ण सापडले असून 20 जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 246 लोकांचा मृत्यू झाला सून 235 रुग्ण निरोगीही झाले आहेत. संकलन-प्रियांका गावडे.