COVID-19 मुलाला अन्न मिळावं म्हणून आई राहते उपाशी, या कुटुंबाची कहाणी ऐकूण डोळ्यात येईल पाणी

COVID-19 मुलाला अन्न मिळावं म्हणून आई राहते उपाशी, या कुटुंबाची कहाणी ऐकूण डोळ्यात येईल पाणी

आधी 14 हजार असणारा पतीचा पगार आता फक्त 7 हजारांवर आलाय. त्यात घरभाडं जाऊन हातात जेमतेम पैसेच राहतात.

  • Share this:

नवी दिल्ली 29 जून: कोरोनामुळे (Coronavirus) सगळे व्यवहार थंडावले आहेत. लॉकडाउन(Lockdown) हटविण्यात आला तरी व्यवसाय अजुन सुरु झालेले नाहीत. त्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात सगळ्यात जास्त फटका बसला तो गरीब कष्टकऱ्यांना. राजधानी दिल्लीत (Delhi) राहणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी आहे. नवरा आणि मुलाला अन्न मिळावं म्हणून घरातली महिलेला उपाशी राहावं लागतंय. आपल्यावर भीक मागायची वेळ येऊ नये यासाठी ही महिला धडपडत असून पतीची नोकरी गेल्याने ते कुटुंब चिंतेत आहे.

सुनीता कुमारी या दिल्लीतल्या एका झोपडपट्टीत राहतात. त्यांचे पती एका शो रुममध्ये नोकर आहेत. मात्र लॉकडाउमुळे त्यांची नोकरी गेली. नंतर दुसरी नोकरी मिळाली मात्र पगार अर्धा झाला. काही वर्षांपूर्वी हे कुटुंब बिहारमधून इथं आलं होतं. त्यामुळे त्यांना दिल्लीत रेशनही मिळत नाही.

तर मुलाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पोटाला चिमटा देऊन आणि धोका पत्करून दिल्लीतच राहत असल्याचं सुनीता यांनी सांगितलं. आधी 14 हजार असणारा पतीचा पगार आता फक्त 7 हजारांवर आलाय. त्यात घरभाडं जाऊन हातात जेमतेम पैसेच राहतात. तेवढ्या पैशात संसार चालवणे कठिण असल्याचं त्यांनी सांगितलं.

Tik Tok वर बंदी घातल्याने आता या स्टार्सचं काय होणार? लाखांमध्ये आहे कमाई

तुटपुंज्या पगारात घरं चालवायचं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे ठेवायचे त्यात आजारापणाची भीती. त्यामुळे सुनीता कुमारी यांची तारेवरची कसरत होत आहे. कोरोनाचं संकट जाईपर्यंत कसेतरी दिवस पुढे ढकलायचे असं त्यांना वाटतं. पैसे आणि अन्न संपलं तर भीक मागायची वेळ येऊ नये एवढीच त्यांची इच्छा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार, सगळ्यांचं लागलं लक्ष

कोरोनाचं संकट केव्हा संपेल असा प्रश्न त्यांना पडला आहे. हे संकट लवर संपावं आणि पूर्वीचे दिवस यावेत असं त्यांना वाटतं. अशीच लाखो कुटुंब आज संकटात आहेत असंही त्यांनी सांगितलं.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

First published: June 30, 2020, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading