कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह रुग्णाला असं तणावमुक्त ठेवतात डॉक्टर्स; पाहा VIDEO

कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह रुग्णाला असं तणावमुक्त ठेवतात डॉक्टर्स; पाहा VIDEO

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. डॉक्टर्स दिनाच्या (Doctors day) निमित्ताने अशाच काही व्हिडीओवर नजर टाकूयात.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जुलै : दरवर्षी आजच्या दिवशी डॉक्टर्स डे (Doctors day) साजरा केला जातो. कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) या परिस्थितीत आज प्रत्येकाला खऱ्या अर्थाने या दिवसाचं महत्त्व समजतं आहे. कोरोना काळात थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या या डॉक्टरांवर सर्वसामान्यांपेक्षा जास्त ताण आहे. मात्र तरीदेखील रुग्णाला आणि स्वत:ला ते तणावमुक्त ठेवण्यासाठी शक्य ते सर्व करतात.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक डॉक्टर डान्स करताना दिसले. मग हा डान्स स्वत:च्या कामाचा ताण कमी करण्यासाठी विरंगुळा म्हणून असो, रुग्णाच्या मनावरील ताण कमी करून त्याचं मनोबल वाढवण्यासाठी असो किंवा मग रुग्ण बरं झाल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी. डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने अशाच काही व्हिडीओवर नजर टाकूयात.

देशातील 60 डॉक्टरांचा डान्स

The Ministry of Memories या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या 60 डॉक्टरांचा समावेश आहे.

मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, नागपूर, सुरत, इंदोर, आग्रा, प्रयागराज आणि इतर अशा विविध शहरातील हे डॉक्टर्स आहेत. हे सर्व डॉक्टर आनंदाने नाचताना दिसत आहेत.

हे वाचा - भारतातील सर्वात वयस्कर कोरोना फायटर; 103 वर्षांच्या आजोबांनी व्हायरसला हरवलं

संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीत आहे. अशा परिस्थिती लोकांना आशेचा किरण दाखवण्याचा, त्यांचं मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न या डॉक्टरांनी केला.

आयसीयूमध्ये डॉक्टरांचा डान्स

यूएसमधील रोनाल्ड रिगॅन यूसीएलए मेडिकल सेंटरमधील आयसीयूमधील डॉक्टरही आयसीयूमध्ये डान्स करताना दिसले. ज्या रुग्णांची त्यांनी सेवा केली ते बरे झाले, व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेऊ लागले, त्यावेळी या सर्वांनी असा आनंद साजरा केला.

या सेंटरमधील निदा कादिर या अॅकडमिक इन्टेटिव्हिस्टने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

रुग्णाचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांचा डान्स

कोरोनाव्हायरसची लागण झालेला रुग्ण मानसिकरित्याही खचलेला असतो. या आजाराची इतकी भीती निर्माण झाली आहे की त्यांच्या मनात सकारात्मकता आणणं म्हणजे एक आव्हानच आहे.

कानपूरच्या हॅलेट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मग रुग्णाच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी असा डान्स केला. यावेळी त्यांनी आवश्यक ती पुरेपूर खबरदारीही घेतली.

ताण दूर करण्यासाठी 100 डॉक्टरांचा डान्स

कोरोना योद्धा डॉक्टर फक्त शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्याही थकलेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना मनात थोडी भीती असतेच, शिवाय ताणही असतो.

या ताणावर मात करण्यासाठी तामिळनाडूतील 100 डॉक्टरांनी असा डान्स करून आपला व्हिडीओ शेअर केला आणि फक्त स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवलं.

ताणावर मात करण्यासाठी डॉक्टरांचा डान्स

तामिळनाडूप्रमाणेच बंगळुरूतल्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील डॉक्टरही आपला ताण दूर करण्यासाठी डान्स करताना दिसले. पीपीई किट घालूनच जुन्या गाण्यावर हे डॉक्टर थिरकले.

हे वाचा - FACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण?

आपला घरदार सोडून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. विशेष म्हणजे फक्त आपली ड्युटी बजावयची म्हणून ते काम करत नाही, तर आपल्या या कर्तव्यात तसूभरही कसर राहू नये, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खरं तर फक्त आजचा दिवसच नव्हे तर प्रत्येक दिवस हा डॉक्टरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: July 1, 2020, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading