JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्नाटक, केरळात 'कोरोना'चे आणखी रुग्ण, भारतात व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला

कर्नाटक, केरळात 'कोरोना'चे आणखी रुग्ण, भारतात व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला

कर्नाटक (Karnataka) आणि केरळात (Kerala) कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) आणखी रुग्ण आढळून आलेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 मार्च : कर्नाटक (Karnataka) आणि केरळात (Kerala) कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) आणखी रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आता भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढली आहे. कर्नाटकात 4 आणि केरळात 6 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. कर्नाटकात 4 व्यक्तींना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. या चारही जणांचे कोरोनाव्हायरसच्या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी ही माहिती दिली आहे. संबंधित -  पुण्यातही धडकला कोरोना, दोन रुग्ण सापडल्याने खळबळ कर्नाटकात कोरोनाव्हायरसचा जो पहिला रुग्ण आढळून आला, त्याच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय आणखी एका व्यक्तीलाही कोरोनाव्हाययरसची लागण झाली आहे. ही व्यक्तीदेखील कर्नाटकातल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचं सांगितलं जातं आहे.

कर्नाटकात सोमवारी कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला. यूएसहून बंगळुरूत आलेला हा रुग्ण आयटी इंजिनीअर आहे. त्याला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलीचीही तपासणी करण्यात आली आणि तेदेखील कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.

शिवाय केरळातही आणखी 6 रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी दिली. संबंधित -  धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या