Home /News /videsh /

कोरोनाव्हायरसमुळे कोट्यवधी लोकांचा होणार मृत्यू, संशोधकांचा धक्कादायक दावा

कोरोनाव्हायरसमुळे कोट्यवधी लोकांचा होणार मृत्यू, संशोधकांचा धक्कादायक दावा

एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात दीड कोटी लोकांचा मृत्यू होणार आहे. भारतातील (India) लाखो लोकांचा या समावेश आहे.

    मेलबर्न, 09 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत 3,800 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू (Coronavirus death) झाला आहे. या महाभयंकर व्हायरला आळा घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. तरीदेखील हा व्हायरस दीड कोटी लोकांचा जीव घेऊ शकतो, एका संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा धक्कादायक दावा केला आहे. संशोधकांच्या मते, जर जगभरात कोरोनाव्हायरसला आळा घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात 6 कोटी 80 लाख लोकांचा मृत्यू होईल. संबंधित - ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, 'कोरोना'पासून वाचण्यासाठी पाहा हा Video रिसर्चनुसार, चीन आणि भारतात लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो. अमेरिकेत 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ब्रिटनमध्ये 64 हजार, जर्मनी 79 हजार आणि फ्रान्समध्ये 60 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि इटलीतही हजारो लोकांचा जी जाऊ शकतो. भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 43 रुग्ण आढळून आलेत. कोरोनाव्हायरसमुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र या धक्कादायक संशोधनानुसार भारताने आणखी सावध राहायला हवं. अर्थव्यवस्थेवरही होणार परिणाम कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील शेअर बाजार घसरतो आहे. संशोधनानुसार, ग्लोबल जीडीपी 2.3 ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये 2 टक्के आणि ब्रिटनच्या जीडीपीमध्ये 2.3 टक्क्यांची घट येऊ शकते. संबंधित - आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus in india

    पुढील बातम्या