JOIN US
मराठी बातम्या / देश / एक ठिणगी अन् 500 हून अधिक दुकानं जळून खाक, 8 तासांपासून सुरुय अग्नितांडव पाहा VIDEO

एक ठिणगी अन् 500 हून अधिक दुकानं जळून खाक, 8 तासांपासून सुरुय अग्नितांडव पाहा VIDEO

कानपूर : एका ठिकणगीनं अख्ख कॉन्मप्लेक्स उद्ध्वस्त केलं. 500 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 50 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. साधारण 8 तासांहून अधिक वेळ ही आग धुमसत होती. त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. कानपूरच्या बनसमंडी भागात असलेल्या कापड बाजारात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर : एका ठिकणगीनं अख्ख कॉन्मप्लेक्स उद्ध्वस्त केलं. 500 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 50 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. साधारण 8 तासांहून अधिक वेळ ही आग धुमसत होती. त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. कानपूरच्या बनसमंडी भागात असलेल्या कापड बाजारात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

आगीची माहिती मिळताच कानपूरच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आल्या आहेत. मात्र परिस्थिती अनियंत्रित होत असल्याने उन्नाव आणि लखनऊच्या इतर जिल्ह्यांमधूनही वाहने मागवावी लागली. सध्या 500 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती मिळाली नाही. कूलिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या