JOIN US
मराठी बातम्या / देश / JNU कॅम्पसमध्ये वीर सावरकरांच्या नावावर फासलं काळं, आंबेडकरांचं नाव लिहून लावला जिन्नांचा फोटो

JNU कॅम्पसमध्ये वीर सावरकरांच्या नावावर फासलं काळं, आंबेडकरांचं नाव लिहून लावला जिन्नांचा फोटो

जेएनयू विद्यापीठातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियंका कांडपाल / नवी दिल्ली, 17 मार्च : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU Campus) कॅम्पसमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा काही उपद्रवींनी ‘विनायक दामोदर सावरकर मार्ग’ लिहिलेल्या बोर्डावर काळं फासलं आहे. वीर सावरकरांच्या नावावर काळ लावल्यानंतर काही समाज कंटकांनी त्या बोर्डावर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिलं. याशिवाय मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटोही लावण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा जेएनयू कॅम्पसमध्ये विनायक दामोदर सावरकर मार्गावर समाज कंटकांनी हा प्रकार केला. हे वाचा -  ISIS मध्ये असलेल्या केरळच्या तरुणीने जारी केला व्हिडीओ, म्हणाली भारतात यायचंय! नुकतीच जेएनयू प्रशासनाने कॅम्पसमधील एका रस्त्याला वीर सावरकरांचं नाव दिलं आहे.  विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुशी घोष यांनीही या निर्णयावर टीका केली. मात्र जेएनयू प्रशासनाने आपला निर्णय कायम ठेवला. जेएनयू प्रशासनाने या रस्त्याचे नाव विनायक दामोदर सावरकर मार्ग असे ठेवले आहे, त्याच रस्त्याच्या साइन बोर्डावर काही समाज कंटकांनी सोमवारी रात्री काळा रंग लावला आणि त्यावर भीमराव आंबेडकरांचं नाव लिहिलं. इतकंच नाही तर त्यांनी साइन बोर्डावर जिन्नांचा फोटो चिकटवला. या प्रकरणात कोण सहभागी आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. त्याचबरोबर यासंदर्भात कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे वाचा -  घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात प्रतिमा बसविण्यावरून वाद गेल्या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेच्या स्थापनेविषयी दिल्ली विद्यापीठात गदारोळ झाला होता. तत्कालीन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शक्ती सिंग यांनी नॉर्थ कॅम्पसस्थित आर्ट्स फॅकल्टीच्या गेटवर वीर दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या प्रतिमा लावण्याची परवानगी दिली होती. यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. यावेळी वीर सावरकरांच्या प्रतिमेला काळी शाई देखील लावण्यात आली होती. बराच काळ सुरू असलेल्या गोंधळानंतर या प्रतिमा काढाव्या लागल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या