JOIN US
मराठी बातम्या / देश / मोहरमच्या मिरवणुकीत दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू; झेंडा बनला काळ

मोहरमच्या मिरवणुकीत दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू; झेंडा बनला काळ

झारखंडच्या बोकारो जिह्ल्यात शनिवारी सकाळी उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चौघांचा मृत्यू झाला. मोहरमच्या मिरवणुकीवेळी ही घटना घडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 29 जुलै : मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. झारखंडच्या बोकारो जिह्ल्यात शनिवारी सकाळी उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चौघांचा मृत्यू झाला. मोहरमच्या मिरवणुकीवेळी ही घटना घडली. याबाबत बोकारो पोलीस अधीक्षक प्रियदर्शी अलोक यांनी सांगितले की, रांचीपासून ८० किमी अंतरावर असलेल्या पेटरवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेतको गावात ही घटना घडली. मिरवणुकीतील झेंड्याचा वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर शॉक बसून चौघे मृत्यूमुखी पडले. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी मोहरमच्या मिरवणुकीची तयारी करत होते. त्यांच्या हातात असलेल्या झेंड्याचा दांडा लोखंडी होता. हा झेंडा ११ हजार व्होल्टच्या उच्च दाबाच्या वीज तारेला लागला. यामुळे जोराचा शॉक बसला. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरबाबत ATS तपासात धक्कादायक माहिती समोर  

संबंधित बातम्या

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८ जणांना बोकारो जनरल रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिघांची प्रकृती गंभीर असून या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या