JOIN US
मराठी बातम्या / देश / MP: रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट; 30 ते 35 फूट उंच उडाले दगड, पाहा LIVE VIDEO

MP: रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट; 30 ते 35 फूट उंच उडाले दगड, पाहा LIVE VIDEO

अन् थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, रेल्वे स्थानकाजवळील भीषण स्फोटाचा LIVE VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 06 सप्टेंबर : जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता एवढी मोठी होती की 30 ते 35 फूट उंच स्फोटात दगड उडून खाली पडले. जबलपूरमध्ये रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात झाला. जबलपूरजवळील दुंडी येथे कटनी-बीनासाठी तिसरी रेल्वे लाइन तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याच दरम्यान रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी एका मोठ्या डोंगराला स्फोटकांच्या मदतीनं भोगदा पाडायचा होता. हा स्फोट इतका भयंकर होता की घटनास्थळापासून दगड उंच उडून 30 ते 35 फूट लांब जाऊन पडले. ओव्हरहेड वायरवरला हे दगड लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. तर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्येही दगड कोसळले आहेत. सुदैवानं या ट्रेनमध्ये कुणी प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

संबंधित बातम्या

हे वाचा- माओवाद्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जबलपूर झोनच्या सीपीआरओ प्रियांका दीक्षित यांनी सांगितले की, ज्या टेकडीला बारूदानं उडवलं त्याचं नियोजन आणि हे काम करणारी कंपनी अनुभवी आहे. डोंगरावर विस्फोट संपूर्ण नियोजनानंतर करण्यात आले. वेगाने झालेल्या स्फोटामुळे ओव्हरहेड व्हायरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निश्चित काळजी घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये जर प्रवासी असते तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या