माओवाद्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जवानांनी 20 किमीचा टप्पा केला पार

माओवाद्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जवानांनी 20 किमीचा टप्पा केला पार

माओवाद्यांनी ठार केलेल्या चार आदिवासी नागरिकांचे मृतदेह जवानांनी तब्बल वीस किलोमीटरचा पायी प्रवास करून सुरक्षित पोहोचले.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली, 5 सप्टेंबर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात जनअदालत भरवून माओवाद्यांनी ठार केलेल्या चार आदिवासी नागरिकांचे मृतदेह जवानांनी तब्बल वीस किलोमीटरचा पायी प्रवास करून सुरक्षित पोहोचले. विशेष म्हणजे यावेळी जवानांना तुडुंब वाहणारी नदी पार करून यावं लागलं.

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात मेटपाल आणि पुसनार गावातून दोन दिवसांपूर्वी 26 नागरिकांचे माओवाद्यांनी अपहरण केलं होते. यात चौघांची जनअदालत भरवून डुमरीपालच्या जंगलात त्यांचे मृतदेह टाकले होते.

ही माहिती समोर आली, पण मृतदेह असलेला परिसर दहा किलोमीटर दूर घनदाट जंगलात मिंगाचल नदीच्या पलीकडे होता. त्यामुळे अखेर बिजापूर पोलीस दलाचे जवान अभियान राबवत तिथे नदी पार करुन पोहचले आणि तिथून मृतकांचे मृतदेह घेऊन ती नदी पायी प्रवास करत पार करून पोलीस ठाण्यात पोहचले.

हेही वाचा - विचित्र अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार! दुभाजक ओलांडून थेट घरात घुसला टेम्पो

अद्यापही 16 नागरीक अजूनही माओवाद्याच्या ताब्यात आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. काल दंतेवाडा जिल्ह्यात दोन जणांची हत्या केली होती. आज ही दुसरी घटना उघड झाली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 5, 2020, 11:53 PM IST

ताज्या बातम्या