तिरुवनंतपुरम, 13 जुलै : भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरू होण्याआधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज गेली होती. चांद्रयान 3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, इस्रोच्या टीमने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी बालाजीच्या चरणी चांद्रयान 3 ची लहान प्रतिकृती अर्पण करण्यात आली. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी होणार असून ते चंद्रावरण 23 ऑगस्ट रोजी उतरण्याची शक्यता आहे. याआधी 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान मोहिम अयशस्वी ठरली होती. तेव्हा पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाले होते. यानंतर पुन्हा चार वर्षांनी इस्रो चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतलं बालाजीचं दर्शन, पाहा PHOTO
चांद्रयान ३ मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अथक मेहनत घेतली आहे. आता अखेरच्या टप्प्यातली तयारीही झाली असून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपती बालाजीचे आशीर्वाद या मोहिमेत लाभावे अशी प्रार्थना केली. चांद्रयान-3 मोहिमेत चांद्रयान चंद्रावर उतरून तिथलं वातावरण आणि परिस्थिती यांचा अभ्यास करणार आहे. तर याआधी झालेल्या दोन्ही चांद्रयान मोहिमांमध्ये चंद्राच्या सभोवताली असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता.