केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एकादशीच्या निमित्याने आंध्र प्रदेशमधील तिरुमला इथे भेट दिली. यावेळी त्यांनी सहपरिवार बालाजीचे दर्शन घेतलं. गेले दोन दिवस नितीन गडकरी आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. [caption id="attachment_919740" align="alignnone" width="1066"] गडकरी यांनी आज सकाळी सहपरिवार बालाजी मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. [/caption] यावेळी मंदिर समिती कडून नितीन गडकरी यांचं सत्कार करण्यात आला.