JOIN US
मराठी बातम्या / देश / ISIS दाम्पत्याकडून तरुणांना जिहादी बनविण्याचा प्रयत्न; दिल्लीसह या दोन राज्यांमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा होता प्लान

ISIS दाम्पत्याकडून तरुणांना जिहादी बनविण्याचा प्रयत्न; दिल्लीसह या दोन राज्यांमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा होता प्लान

पुणे कनेक्शन असलेल्या या दाम्पत्याचा दिल्लीसह दोन राज्यांमध्ये आत्मघातकी हल्ला करण्याचा प्लान होता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 मार्च : दिल्लीत अटक झालेल्या इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (ISIS) शी संबंधित संस्थेसाठी काम करणाऱ्या संशयित दहशतवादी दाम्पत्य जहांजेब सामी आणि हिना बशीर बेग दिल्ली, उत्तर प्रदेश व काश्मीर या ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यांनी रेकी करण्यास सुरुवात केली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण होणाऱ्या गोंधळात अधिकाधिक लोकांचा मृत्यू व्हावा, असा दहशतवादी दाम्पत्याचा प्रयत्न होता. या हल्ल्यासाठी ते दिल्ली व उत्तर प्रदेशातील तरुणांना तयार करीत होते. आक्षेपार्ह पुस्तके आणि व्हिडीओ दाखवून तरुणांच्या भावना भडकावल्या जात होत्या आणि तरुणांना जिहादी बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. हे आयएसकेपीसोबत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जोडले गेलेले होते. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (ISIS) या जहाल दहशतवादी संघटनेच्या खुरासान मोड्युलशी संबंधित असल्याच्या संशयावरून या दोघांना अटक केली आहे. हे पती-पत्नी दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोघांकडून संवेदनशील साहित्यही जप्त केलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडियन मुस्लिम युनाइट’ नावाने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे दोघं चालवत होते. संबंधित- दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या कॉल डिटेल्समधून मोठा खुलासा, 12 जणांशी करीत होता बातचीत CAA, NRC विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा हेतू होता. अटक करण्यात आलेल्या दांम्पत्याचा इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही ऑगस्ट-2019 पासून दिल्लीत राहत आहेत. दाम्तत्याकडे आक्षेपार्ह दस्ताऐवज देखील आढळून आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या