दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या कॉल डिटेल्समधून मोठा खुलासा, 12 जणांशी करीत होता बातचीत

दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या कॉल डिटेल्समधून मोठा खुलासा, 12 जणांशी करीत होता बातचीत

पोलिसांवर पिस्तुल रोखणारा शाहरुख आणि ताहिर यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का? याचाही तपास केला जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मार्च : पोलिसांनी आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या जवळील लियाकत, रियासत आणि ताकिर रिझवी यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी लियाकत आणि रियासत चांद बाग, तारिक रिझवी जाकीर नगर येथील राहणारे आहेत.

दिल्ली हिंसाचारानंतर ताहिर रिझवीने ताहिर हुसैन यांना आपल्या घरात लपवले होते. हिंसेदरम्यान ताहिर हुसैन ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यापैकी 12 जणांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. दुसरीकडे तपास करण्यासाठी एसआयटी आणि एफएसएलची टीम शिव विहार येथील राजधानी पब्लिक शाळेत पोहोचली. तपासनंतर एसआयटी शाळा तात्पुरती बंद केली आहे.

संबंधित - दिल्ली हिंसाचार : 'आप'चे ताहिर हुसैन यांची पक्षातून हकालपट्टी

आयबीचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेले ताहिर हुसैन यांची परवानाधारक पिस्तुल आणि 24 काडतुसे एसआयटीने ताब्यात घेतली आहे. पिस्तुल त्यांच्या घरातून जप्त करण्यात आली आहे. पिस्तुल आणि काडतुसं एफएसएल येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ताहिर यांच्या घराजवळ अजय गोस्वामी नावाच्या एका तरुणाला गोळी झाडण्यात आली होती. यामध्ये ताहिर यांच्या परवानाधारक पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता का? याबाबत एफएसएल तपास करणार आहे. आतापर्यंत एफआयआरमध्ये ताहिरचे नाव आहे. ताहिर यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला आहे.

संबंधित - दिल्ली हिंसाचार, आयबी कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी AAP नेत्याविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे ताहिर यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, हिंसेच्या वेळी उपद्रवींबरोबर त्यांचा सावत्र भाऊ शाह आलमही छतावर होता. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार या जिल्ह्यातील हिंसा ही नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांवर पिस्तुल रोखणारा शाहरुख आणि ताहिर यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का? याचाही तपास केला जात आहे. हिंसेच्या वेळी ताहिर 12 लोकांशी फोनवरुन बातचीत करीत असल्याचे ताहिरच्या कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

उपद्रवींनी त्यांच्या घराच्या छतावर नियंत्रण आणले होते. हुसैनने याबाबत पीसीआरला कॉल केले होते मात्र सतत कॉल केल्यानंतरही त्याची मदत केली नसल्याचे ताहिर हुसैन यांनी सांगितले.

First published: March 8, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या