JOIN US
मराठी बातम्या / देश / Make In Indiaच्या जोरावर चीनला टक्कर, भारतच स्वबळावर कोरोनाला हरवणार

Make In Indiaच्या जोरावर चीनला टक्कर, भारतच स्वबळावर कोरोनाला हरवणार

आता 31 मेपासून दररोज 1 लाख टेस्ट होणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

जाहिरात

रशियाने फक्त 38 लोकांवरच त्याचा प्रयोग केल्याचंही सांगितलं जात होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यात केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा वेग वाढत असला तरी भारतात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर जास्त जास्त टेस्ट करून बाधित लोकांना आयसोलेट करावं असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मात्र त्या प्रमाणावर टेस्टिंग करण्यासाठी भारताकडे किट्स उपलब्ध नव्हत्या. आता स्वदेशी कंपन्यांनी किट्स तयार केल्या असून भारताला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पुण्यातल्या आणि इतरही कंपन्यांनी कोरोना टेस्ट किट तयार केल्या असून त्याचं उत्पादनही सुरू झालं आहे. त्याच बरोबर या किट्स इतर देशांमधल्या किट्स पेक्षा एकदम स्वस्त आहेत. चीनमधून आयात केलेल्या तब्बल 5 लाख किट्स निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने सरकारने त्याचं कंत्राट रद्द केलं होतं. आता 31 मेपासून दररोज 1 लाख टेस्ट होणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.  भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर मृत्यूचा आकडाही 900च्या वर गेलाय. त्यामुळे कोरोना टेस्टिंग वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन करूनही चीन, इटलीला जमलं नाही ते भारताने केलं, 30 दिवसांत काय झालं? टेस्ट करण्यासाठीच्या 5 लाख किट्स सरकारने चीनमधून आयात केल्या होत्या. मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने त्याचं कंत्राटच रद्द केलं आहे. आता अशा प्रकारच्या किट्स देशातच तयार होत आहेत. त्यासाठी ICMRची मान्यता पाहिजे असून त्याची आम्ही वाट पाहत असल्यचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. VIDEO : रिअल लाइफ हीरो! 84 तास ड्रायव्हिंग करत 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह 31 मे पूर्वी देशात पुरेशा किट्स तयार होतील आणि 31 मेपासून दररोज 1 लाख टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाधा झालेल्यांची संख्या कळेल आणि त्यांना आयसोलेट केलं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या