नवी दिल्ली, 29 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी भारतात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक असे परिणाम दिसत आहेत. लॉकडाऊन करण्यात आला तेव्हा देशात 657 कोरोनाचे रुग्ण होते. त्यानंतरच्या महिन्याभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 23 हजारांवर पोहोचली. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या 30 दिवसात चीन आणि इटलीची आकडेवारी पाहिली तर भारताला मोठं यश मिळाल्याचं दिसत आहे.
चीनमध्ये 23 जानेवारीला लॉकडाऊन करण्यात आलं होतं तोपर्यंत 830 कोरोना रुग्ण होते. त्यानंतर पुढच्या 30 दिवसात रुग्णांची संख्या 76 हजारांवर पोहोचली. चीनने सुरुवातीला फक्त दोन शहरांमध्येच लॉकडाऊन केला होता त्याचाही फटका त्यांना बसला.
दुसरीकडे कोरोनाने ज्या देशात हाहाकार माजवला त्या इटलीत 9 मार्चला लॉकडाऊन कऱण्यात आलं. तोपर्यंत इटलीत 9 हजारांहून अधिक लोकांना कोरोना झाला होता. त्यानंतर पुढच्या 30 दिवसांत इटलीत कोरोना रुग्णांची सख्या तब्बल 1.35 लाख इतकी झाली होती.
पाहा VIDEO : रिअल लाइफ हीरो! 84 तास ड्रायव्हिंग करत 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह
मृत्यू दराचं प्रमाणही भारतात कमी आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापर्यंत भारतात 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या 30 दिवसांत ही संख्या 721 वर पोहोचली. या तुलनेत चीन आणि इटलीमध्ये लॉकडाऊनच्या 30 दिवसांत अनुक्रमे 2345 आणि 17127 लोकांचा मृत्यू झाला.
हे वाचा : लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी! देशातील बेरोजगारीचा दर झाला कमी, काय आहेत कारणं?
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला. त्यानंतर जवळपास 55 दिवसांनी लॉकडाऊन करण्यात आलं. तर चीन आणि इटलीने त्याआधीच लॉकडाऊन केलं होतं. चीनने पहिला रुग्ण सापडल्यानंतर 25 व्या दिवशी तर इटलीने 38 व्या दिवशी लॉकडाऊन घोषित केला होता. तरीही दोन्ही देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडाला.
हे वाचा : कोरोना योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लढला; लेक करणारं त्यांचं अधूरं स्वप्न पूर्ण
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.