नवी दिल्ली, 29 एप्रिल : सध्या lockdown मुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा ठप्प आहेत. या काळात आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णांनासाठी झटत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये अम्ब्युलन्सच्या दोन चालकांनी तब्बल 3 हजार किमी अंतर एक मृतदेह पोहोचवला. त्यांच्या या कार्याबद्दल लोक सलाम करत आहेत.देशाच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत मृतदेह पोहोचवला. मिझोराममधील एका तरुणाचा गेल्या आठवड्यात हृदयविकारान चेन्नईत मृत्यु झाला. त्याचा मृतदेह अॅम्ब्युलन्समधून मिझोरामला पोहोचवण्यात आला. या अॅम्ब्युलन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये रिकाम्या रस्त्यावरून अॅम्ब्युलन्स जाताना दिसत असून रांगेत उभा असलेले लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. लोकांनी यातून अॅम्ब्युलन्स चालकांचे कौतुक केले आहे. अॅम्ब्युलन्सचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये दुसऱ्या एका व्हिडिओत अॅम्ब्युलन्स घराबाहेर उभा आहे. तिथं लोक टाळी वाजवून दोन्ही ड्रायव्हरना सलाम करत आहेत. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मिझोराम रिअल लाइफ हीरोंचे अशा प्रकारे स्वागत करते. कारण आमचा माणुसकी आणि राष्ट्रवादावर विश्वास आहे. तुमचे आभार.
आयजलच्या मॉडेल वेंग मध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या विवियन लालरेमसांगा याचा 23 एप्रिलला चेन्नईत मृत्यू झाला. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मृतदेह गावी नेणं कठीण काम होतं. हे आव्हानात्मक काम जेयंतिजरन आणि चिन्नाथंबी या दोन चालकांनी पार पाडलं. हे वाचा : कोरोनातून बरे झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन झाले बाबा! विवियनचा मृतदेह पोहोचवण्यासाठी अॅम्ब्युलन्ससोबत त्याचा मित्र एवीएल मालछनिमा हा सुद्धा सोबत होता. तिघेही चेन्नईतून चार दिवसांपूर्वी निघाले होते. जवळपास 84 तास ड्रायव्हिंग करत ते मिझोराममध्ये पोहोचले. विवियनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. शेवटी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत विवियनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वाचा : नवं संकट! हवेतून पसरतो कोरोना? वुहानच्या 2 रुग्णांलयातील हवेत आढळला व्हायरस संपादन - सूरज यादव