PTI
राजौरी, 12 जून : पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात राजौरीच्या नौशेरा येथे एक पोलीस जखमी झाले होते. सम्हानी सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानला धडकी भरवणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांनी केलेल्या कारवाई पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या वर्षीही जवानांनी मोठी कारवाई करत दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केलं होतं त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार करण्यात आले होते. मागच्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सातत्यानं सुरू आहेतच. हे वाचा- चीनच्या मुजोरीला भारताचं उत्तर, सैन्याच्या हालचालींसाठी तयार केला जातोय हा मार्ग पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला हिंदवाडा पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत 3 जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. लष्कर ए तोएबाच्या तीन दहशतवाद्यांकडून लाखो रुपये, ड्रग्स आणि काही साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 21 किलो हेरोइन ज्याची बाजारातील सध्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. हे वाचा- बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात हे वाचा- कोरोना संशयित म्हणून घरच्यांनी काढलं घराबाहेर, तापानं फणफणत रस्त्यावर होता भटकत संकलन, संपादन- क्रांती कानेटकर