नवी दिल्ली 12 जून: उत्तराखंडची जोहर व्हॅली हिमालयातील एक अत्यंत दुर्गम स्थान आहे. येथील भारत-चीन सीमेजवळ मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकामांना वेग देण्यात भारताला यश आले आहे. रस्ते बांधकामात वापरल्या जाणार्या मशीन्स हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचविण्यात येत आहेत. चीनच्या धमक्या आणि दबावाला भीक न घालता भारताने या बांधकामाला जोर दिला आहे. सीमा रस्तेबांधणी संघटनेच्या (BRO) माध्यमातून चीन सीमा भागातील्या रस्त्या निमिर्तीचे काम केले जात आहे. 2019 मध्ये अनेक प्रयत्नामध्ये अयशस्वी राहिल्यानंतर सीमा रस्ते संघटना रस्त्यांच्या बांधकामात वापरल्या जाणारे अवजड मशीन्स हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नेण्यात नुकतेच यश मिळाले आहे. यामुळे रस्ता बांधकाम जलद होणे अपेक्षित आहे. दगड तोडण्यासाठी अवजड मशीन्स उपलब्ध नसल्याने 65 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम लांबणीवर पडले होते. हा मार्ग झाला तर सैन्याच्या हालचालींना वेग येणार आहे. त्याचबरोबर सीमेजवळ सैन्य जलदगतीने पोहोचणेही शक्य होणार आहे. हिमालयातील जोहर खोऱ्यातील मुनस्यारी-बोगडीयार-मिलाम रोड बनविण्यात येत आहे. हा भाग उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात येतो. हा रस्ता भारत-चीन सीमेवरील शेवटच्या पोस्टला जोडणार आहे. गेल्या वर्षी अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर गेल्या महिन्यात हेलिकॉप्टरमधून लप्सा येथे अवजड मशीन हेलिकॉप्टर द्वारे वाहून घेऊन जाण्यात यश आले आहे. बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात या आव्हानात्मक मार्गावरील दगड तोडण्याचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अवजड आणि अजस्त्र दगड आणि कातळांना तोडणे सोपे जाणार आहे. कारण अवजड यंत्रांवर हेलिकॉप्टरद्वारे वाहतूक केली जाऊ शकते. या प्रकल्पाचे काम २०१० मध्ये सुरू झाले, जेव्हा त्यासाठी ५२५ कोटी रुपये देण्यात आले. त्याला घ्यायचा होता पोलिसांचा बदला, क्वारंटाईन सेंटरच्या पाण्यात टाकलं विष दोन्ही बाजूंनी रस्ता तयार करण्यात आला असून दगड तोडण्याचे काम 22 किलोमीटर वगळता 40 किलोमीटरमधील दगड तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







