JOIN US
मराठी बातम्या / देश / कोविन ठरलं गेमचेंजर, ‘The Vial – India’s Vaccine Story’ मध्ये PM मोदींचा खुलासा

कोविन ठरलं गेमचेंजर, ‘The Vial – India’s Vaccine Story’ मध्ये PM मोदींचा खुलासा

हिस्ट्री टीव्ही18 ची डॉक्युमेंट्री ‘The Vial – India’s Vaccine Story’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कोरोना लढ्यात कोविन ऍपची भूमिका कशी महत्त्वाची ठरली हे सांगितलं.

जाहिरात

कोरोना लढ्यात कोविन कसं ठरलं गेम चेंजर?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मार्च : अब्जाहून अधिक लोकसंख्या, यातले बरेच जण दूर्गम भागात राहणारे, या सगळ्यांचं लसीकरण करणं हे कोरोना काळातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. हे आव्हान पार करण्यासाठी कोविन ऍप गेम चेंजिग ठरलं. 16 जानेवारी 2021 साली कोविन ऍप लॉन्च करण्यात आलं. कोविन ऍपला मिळालेल्या या यशानंतर आता केंद्र सरकार पुढची योजना आखत आहे. कोरोना काळात भारताला संजिवनी ठरलेल्या कोविन ऍपच्या प्लॅटफॉर्मचा वापर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि देशाच्या इतर आरोग्य कार्यक्रमांसाठी होणार आहे. यासोबतच कोविन ऍप कोरोना लसीकरण आणि त्याच्या सर्टिफिकेटचं कामही सुरूच ठेवणार आहे. हिस्ट्री टीव्ही18 ची डॉक्युमेंट्री ‘The Vial – India’s Vaccine Story’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कोरोना लढ्यात कोविन ऍपची भूमिका कशी महत्त्वाची ठरली हे सांगितलं. ‘भारत हा एकमेव देश आहे जिकडे गर्दी टाळण्यासाठी कोविनसारख्या प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना लस कुठे, कोणत्या वेळेवर मिळेल? तसंच लसीच्या दुसऱ्या डोसची तारीख काय? याची माहिती मिळाली. यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कथन केलेल्या ‘The Vial – India’s Vaccine Story मध्ये कोविड-19 लसीच्या कुपी कशापद्धतीने तयार करण्यात आल्या, तसंच कोविड-19 च्या लसी विकसित करणं, त्याचं उत्पादन करणं आणि वितरण करणं, हे सगळं विक्रमी वेळेत करण्यात कसं यश आलं, याची कहाणी सांगण्यात आली आहे. ‘पारदर्शक पद्धतीने हे सगळं करण्यात आलं, जिकडे व्हीव्हीआयपी आणि गरीब माणूसही तोच डॅशबोर्ड बघत होता. या प्रकारची माहितीमधली एकवाक्यता खूप महत्त्वाची असते,’ असं या डॉक्युमेंट्रीमध्ये नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ डॉ. आरएस शर्मा यांनी सांगितलं. कॅनडा, मॅक्सिको, नायजेरिया आणि पनामा यासारख्या 50 देशांनी त्यांच्या लसिकरणासाठी कोविन सारख्या यंत्रणेमध्ये रस दाखवला. तसंच भारतानेही या देशांना हे सॉफ्टवेअर मोफत देण्याची तयारी दर्शवली, असं डॉ. शर्मा म्हणाले. बिल ऍण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सीईओ मार्क सुझमन यांनीही कोविनचं कौतुक केलं. ‘कोविन ऍप उत्कृष्ट ग्लोबल मॉडेल आहे. आफ्रिकेसारख्या इतर देशांनीही त्यांच्या आरोग्य क्षेत्रासाठी अभ्यास करून विकसित करण्यासारखं हे मॉडेल आहे,’ असं मार्क सुझमन म्हणाले. काय आहे ‘The Vial’? 60 मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस महामारीमध्ये भारताने कसं यश मिळवलं, याबाबत सखोल माहिती दिली आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीपासून सुरू झालेला हा प्रवास अब्जावधी कुप्या बनवण्यापर्यंत कसा पोहोचला? देशाच्या एवढ्या लोकसंख्येसाठी जगातल्या दोन सर्वाधिक प्रभावी लसी विक्रमी वेळेत कशा पूर्ण करण्यात आल्या? याची कहाणी द व्हायल या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगण्यात आली आहे. भारतातल्या अतिशय दूर्गम भागात आरोग्य कर्मचाऱ्यांनी शौर्याने लसी नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. भारत सरकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निर्धाराच्या केस स्टडीही द व्हायल डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या