मुंबई, 09 मे : मोदी सरकारच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनचं काम जोरदार सुरू आहे. 320 किमी प्रति तास वेगानं चालणाऱ्या या ट्रेनमध्ये फोल्डेबल बेड्स आणि वेगवेगळ्या खोल्याही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एसी फर्स्ट क्लासपेक्षा 1.5 पटीनं जास्त भाडं द्यावं लागेल. देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबाद जाईल. या ट्रेनमध्ये काय काय सुविधा असतील ते पाहा. मुंबईहून बँकाॅकला जा फक्त 10 हजार रुपयांत, ‘या’ विमानकंपनीनं दिलीय मोठी ऑफर पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबाद 508.17 कि.मी. प्रवास करेल. यात ती महाराष्ट्रात 155.76 किमी, गुजरातमध्ये 384.04 किमी आणि दादर नागर हवेलीत 4.3 किमी प्रवास करेल. तरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गावर अहमदाबाद, आनंद, साबरमती, भरुच, सूरत, बिलिमोरा, वडोदरा, बोईसर, विरार, वापी, ठाणे आणि मुंबई या 12 स्टेशन्सवर थांबेल. पहिली बुलेट ट्रेन रात्री 8.30 ते 9च्या मध्ये चालेल. ही ट्रेन समुद्राच्या खालूनही जाईल. महिलांसाठी नोकरी करायला ‘हे’ आहेत 10 सर्वोत्तम देश नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेड ( NHSRCL )नं बुलेट ट्रेनचा एका व्हिडिओही प्रसिद्ध केलाय. त्यात कुठल्या सुविधा मिळणार हे दाखवलंय. बुलेट ट्रेनमध्ये मिळतील खास सुविधा यात वेगवेगळ्या खोल्या आहेत. फोल्डिंग बेड्स आहेत.
या खोल्यांचा उपयोग आजारी व्यक्तीसाठी किंवा आईला बाळाला दूध पाजण्यासाठी होईल. यात सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे रॅक्स असतील वर्षाच्या सुरुवातीला रेल्वे बोर्डानं 10 बुलेट ट्रेन बनवणार असल्याचं सांगितलंय. या 10 मार्गांवर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा खर्च 10 लाख कोटी आहे. ही ट्रेन दिल्ली-अमृतसर, दिल्ली- मुंबई, दिल्ली- कोलकाता, दिल्ली-वाराणसी, चेन्नई-बंगळुरू, पाटणा-कोलकाता या मार्गांवर चालेल. मोदींविरोधात 56 अपशब्दांचा पुरावा देताना गडकरींना हसू आवरेना, म्हणाले…