मुंबईहून बँकाॅकला जा फक्त 10 हजार रुपयांत, 'या' विमानकंपनीनं दिलीय मोठी ऑफर

एकीकडे जेट एअरवेज कंपनी बंद पडलीय. तर अनेक विमान कंपन्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती घेऊन आल्यात.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 03:07 PM IST

मुंबईहून बँकाॅकला जा फक्त 10 हजार रुपयांत, 'या' विमानकंपनीनं दिलीय मोठी ऑफर

मुंबई, 09 मे : एकीकडे जेट एअरवेज कंपनी बंद पडलीय. तर अनेक विमान कंपन्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती घेऊन आल्यात. मध्यंतरी विमान प्रवास महाग होतोय, अशाही चर्चा होत्या. पण या काही आॅफर्सनं प्रवाशांना दिलासा मिळालाय. स्पाइसजेट या विमान कंपनीनं  मुंबई ते बँकाॅक रिटर्न ही सेवा सुरू केलीय. या विमानाचं तिकीट आहे फक्त 10095 रुपये.

याशिवाय स्पाइसजेटनं मुंबई ते दुर्गापूर, मुंबई ते अमृतसर, मुंबई ते बागडोरा, मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते डेहराडून, मुंबई ते गोहाटी, मुंबई ते मंगलोर आणि मुंबई ते मदुराई अशी नवी रिटर्न फ्लाइट्स सुरू केलीयत. तीही सर्व 5 हजार रुपयांच्या आत आहेत.

तरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख

द हिंदूनं दिलेल्या बातमीनुसार इंडिगो, एअर एशिया, गो एअर या विमान कंपन्यांनंतर आता स्पाइसजेटनं टर्मिनल 2 वरून 12 नवी विमानं लाँच केलीयत. विमान प्रवास महाग झालाय, अशी चर्चा असतानाच अनेक विमान कंपन्यांनी विमान प्रवास स्वस्त केलाय.

स्पाइसजेटनं आपल्या बिझनेस क्लासचं तिकीट 30 ते 40 टक्के स्वस्त केलंय. मुंबई, दिल्ली, कोलकाता,  बंगळुरू आणि हैद्राबाद इथल्या फ्लाइट्सवर ही सवलत मिळतेय.

महिलांसाठी नोकरी करायला 'हे' आहेत 10 सर्वोत्तम देश

खासगी विमान कंपनी गो एअर (GoAir )नं  स्वस्त तिकिटं आणलीयत. गोएअर 1, 375 रुपयांच्या तिकिटांची आॅफर घेऊन आलीय. या ऑफरची सुरुवात 3 मेपासून सुरू झालीय. ही आॅफर 9 मे 2019 ला संपणार आहे. तुम्ही www.goair.in वर जाऊन तिकीट बुक करू शकता.

सुट्टीच्या काळात राजीव गांधी यांनी INS विराटचा वापर केला? मोदींच्या दाव्यामागील काय आहे वास्तव

या स्किममध्ये बागडोगरा ते गुवाहाटीचं विमानाचं तिकीट आहे 1,375 रुपये. श्रीनगर ते मुंबई तिकीट आहे 6,999 रुपये. या स्किममध्ये गुवाहाटी ते बागडोगराचा दर 1649 रुपये आहे. तर गोव्याहून मुंबई आणि गोव्याहून बंगळुरूचं भाडं 1,999 रुपये आहे. याशिवाय दिल्लीहून जम्मू तिकिटाची किंमत आहे 1,999 रुपये.


दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close