तरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख

तरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख

तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी भारतीय लष्कर एक नवी योजना घेऊन येतेय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 09 मे : तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी भारतीय लष्कर एक नवी योजना घेऊन येतेय. शाॅर्ट सर्विस कमिशनमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावं म्हणून चांगल्या पगाराचं पॅकेज, पेड स्टडी लिव्ह आणि 10 किंवा 14 वर्षाचा कार्यकाळ संपवला की हातात चांगली रक्कम या गोष्टी दिल्या जातील.

पुण्यातील साडी सेंटर आगीत भस्मसात; अंगावर शहारे आणणारे PHOTO

काय आहे प्लॅन?

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी एका इंग्लिश वर्तमानपत्राला सांगितलं की, सैन्यात अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. म्हणूनच नवं पाऊल उचललं जाणार आहे. नव्या पॅकेजची तयारी पूर्ण झालीय. मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्ष काम करून लष्कराची सेवा सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना 17 लाख रुपये मिळणार. तर 14 वर्ष सेवाकाळ पूर्ण केला तर 38 लाख रुपये दिले जातील.

महिलांसाठी नोकरी करायला 'हे' आहेत 10 सर्वोत्तम देश

नव्या पॅकेजप्रमाणे दर वर्षी दोन महिन्यांचा जादा पगार जोडून वर्षाच्या शेवटी दिला जाईल. सुरुवातीला 10 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी दोन महिन्यांचा पगार आणि शेवटच्या 4 वर्षांत 4 महिन्यांचा पगार दिला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार शाॅर्ट सर्विस कमिशनप्रमाणे अधिकाऱ्यांची 20 वर्ष पूर्ण होतील आणि त्यांना निवृत्ती वेतन मिळेल, यासाठी त्यांना डिफेन्स सिक्युरिटी काॅर्प्स किंवा नॅशनल कॅडट काॅर्प्समध्ये पाठवलं जाईल. हे व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी पेड स्टडी लिव्ह आणि इतर सुविधांचा विचार केला जाईल.'

‘राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचं ‘ते’ विधान चुकीचं’; भाजप नेत्याचा घरचा अहेर

लष्करात अधिकाऱ्यांची कमतरता

सध्याच्या स्थितीत लष्करात 49,933 अधिकाऱ्यांची गरज आहे. पण त्याऐवजी 42,635 अधिकारीच सेवेत आहेत. अशा प्रकारे सेनेत 7 हजारापेक्षा जास्त अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तर भारतीय नौदलात 1,606 अधिकारी कमी आहेत. वायुसेनेत अधिकारी आणि जवान यांची जास्त कमतरता नाही. तिथे फक्त 192 अधिकारी पदं रिकामी आहेत.

VIDEO: 6 महिन्यांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं

First published: May 9, 2019, 1:40 PM IST
Tags: armyjobs

ताज्या बातम्या